
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपूर:- वलांडी ता . देवणी जि. लातूर येथे वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्र समोरील रस्त्यावर असलेली अतिक्रमण तात्काळ कारवाई करण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी अमरण उपोषणाला बसण्यात आले आहे तरी यांच्या या (१) वलांडी प्राथमिक आरोग्य केंद्रा समोरील जागेतील अतिक्रमण तात्काळ काढणे (२)१४ वा वित्त आयोग निधीतून बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राससोरील सार्वजनिक शौचालयातील अतिक्रमण काढून संबधीतावर कडक कार्यवाही करावी.(३)केंद्रीय जिल्हा परिषद शाळेतील मुख्याधिपिका व पदवीधर शिक्षक यांची तात्काळ बदली करणे बाबत.(४)दलीत वस्तीत पथदिवे,दलीत वस्तीत लावणे बाबत.(५) गावातील शासकीय जागेची नोंद नमुना २२ ला लावणे बाबत.(६) वलांडी येथील इनामी जमीन सर्वे ११७ फेर क्र.६९,४६ १९६१ या रद्द करून राचोटी आप्पा देवस्थान च्या नावे अलम करणे बाबत.(७) पाणीपुरवठ्यासाठी ८ कोठी मंजूर निधीचे वितरण पत्र देणे बाबत.(८) बौद्ध स्मशानभूमी (दफनभूमी)जागा मोजून ताब्यात देऊन नोंद घेणे बाबत.इतर मागणिबाबत चौकशी करून कायदेशीर कार्यवाही करावी या बाबत गेली १२ महिन्यापासून मागणी आहे .पण संबधीत चौकशी अधिकारी गोलमाल खोटा चौकशी अहवाल सादर करून प्रकरण दाबण्याचे कटकारस्थान करीत आहे. तेव्हा संबंधतित चौकशी अधिकारी यांच्यावर हक्कभंगाची व निलंबनाची कार्यवाही करण्यात यावी या प्रमुख मागणीची गंभीर्याने प्रशासनाने दखल घ्याववी अन्यथा जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल याची संबंधितांनी प्रशासकीय कार्यालयाने दखल घ्यावी
अशा पद्धतीचे पत्र देताना उपोषण करते विलास वाघमारे.शफिक सौदागर.संतेष गायकवाड असाऊदुल्लाखा पठण यान देण्यात आले यावेळी जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे लातूर जिल्हाध्यक्ष नय्युम खाजामिय्याॅ शेख वलांडीकर व सगीर मौनीन व जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचे वलांडी शाखचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते