
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
१७ सप्टेंबर ते २ आक्टोबर महत्मा गांधी जयंती दरम्यान सेवा सप्ताहचे आयोजन
भूम:- मराठवाड्यामध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधत तर देशभरात देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस विविध सामाजिक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
यानिमित्ताने भूम तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने १७ सप्टेंबर ते २ आक्टोबर २०२२ महत्मा गांधी जयंती दरम्यान सेवा सप्ताह आयोजित केला आहे. या सेवा सप्ताहात भव्य रक्तदान शिबिर रेणुका ब्लड बँक धाराशिव यांच्या सहकार्याने नागोबा चौक भूम येथे घेण्यात आले. तर ग्रामीण रुग्णालय भूम येथे मोफत आरोग्य तपासणी करून रुग्णांना फळ वाटप करण्यात आले. रक्तदान शिबिरामध्ये तब्बल ५२ रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्याला हातभार लावला आहे.
संपूर्ण कार्यक्रमासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस माजी आ. सुजितसिंह ठाकूर माजी मंत्री आ. राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिर ,रुग्णांना फळ वाटप व मोफत रुग्ण तपासणी शिबिराच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टीचे भूम तालुका अध्यक्ष महादेव वडेकर, सरचिटणीस संतोष सुपेकर, भूम शहराध्यक्ष शंकर खामकर, माजी नगरसेवक रोहन जाधव, उद्योग आघाडी तालुका अध्यक्ष बापू बगाडे, प्रदीप साठे, संजय गायकवाड, महेबूब शेख, माजी सैनिक फेडरेशन तालुका अध्यक्ष हेमंत पुरुषोत्तम देशमुख, सचिन बारगजे , युवा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब कुटे , सरचिटणीस सचिन मस्के, आदिवासी समाज जिल्हाध्यक्ष शंकर पवार, किसान मोर्चा तालुका उपाध्यक्ष बिभिषण टाळके ,रोहिदास भोसले, मुकूंद वाघमारे, श्रीकांत सानप, प्रमोद बाकलीकर , श्रीकृष्ण पाटिल, चंद्रकांत गवळी, समाधान बोराडे, संदिप खराडे, श्रीपाद देशमुख, सुरेश वैदय, सिद्धार्थ जाधव , भाजपचे माजी उपनगराध्यक्ष श्रीराम मुळे, पिंटू भारती , गौतम सितापे , विधिज्ञ संजय शाळू, अंगद मुरुमकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.