
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
अखिल महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशन च्या वतीने बेरवाडी तेल महाड चे कल्पेश अनंत यादव यांची अखिल कोकण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.हि निवड ऑल इंडिया ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे मुख्य सचिव लवकुमार जाधव तसेच अखिल महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष किशोर ढोबळे आणि अखिल महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सचिव मदन बदर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे .
या निवडीनंतर कल्पेश यादव यांनी बोलताना सांगितले की अखिल महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेट च्या माध्यमातून येणाऱ्या काळात उत्तम क्रिकेटपटू तयार करून जास्तीत जास्त ग्रामीण भागातील क्रिकेट प्रेमींना चांगल्या दर्जाच्या खेळामध्ये मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
कल्पेश यादव यांनी आज पर्यंत क्रिकेट असोसिएशन च्या माध्यमातून तालुका जिल्हा पातळीवर आणि विभागीय पातळीवर क्रिकेट स्पर्धाच्या आयोजित करून क्रिकेट प्रेमींना ग्राऊंड निर्माण करुण दिले आहे.
याच त्यांच्या निवडीने आज कोकण विभागातील क्रिकेट प्रेमींमध्ये नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील खेळाडूंना आता आंतरराष्ट्रीय खेळामध्ये संधी मिळणार अशी आशा या भागातील क्रिकेट प्रेमी करीत असून त्यांच्या या निवडीबद्दल सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.