
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
परभणी : मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे औरंगाबाद येथे आले असता त्यांनी परभणी शहरासह जिल्ह्यातील अन्य विकास कामांसाठी ज्या घोषणा केल्या आहेत, त्यात पुढीलप्रमाणे कामांचा समावेश आहे. परभणी शहरासाठी मुबलक अशा पाणी पुरवठा योजनेसाठी मान्यता. भूयारी गटार योजनेस मंजूरी व तात्काळ अंमल. भूयारी गटार योजनेच्या मल शुध्दीकरण व मल नि:सारण केंद्रास मंजूरी आणि कृषी विद्यापीठाच्या जागेची उपलब्धता.
स्त्री रुग्णालयासाठी निधी. वैद्यकीय महाविद्यालय बांधकामासाठी जागेची उपलब्धता. छत्रपती शिवाजी महाराज नाना-नानी उद्यानाचे आधुनिकीकरणास निधीची उपलब्धता. जिल्हा क्रीडा संकुलाच्या पुनर्वसन केंद्रास मंजूरी. जिल्हा क्रीडा संकुलाच्या बांधकामासाठी कृषी विद्यापीठाच्या जागेची उपलब्धता. जिल्हा दिव्यांग रुग्णालय केंद्रास मंजूरी. धारासूर येथील प्राचिन गुप्तेश्वर मंदीराच्या बांधकामासाठी निधीची उपलब्धता केली जाणार असल्याची घोषणा करुन मुख्यमंत्री शिंदे यांनी समस्त परभणी करांना सुखद धक्का दिला आहे.
परभणी हा निजामकालीन जिल्हा असून आता पर्यंत जी काही सरकारे आली, त्या सर्वांनी याच परभणी जिल्ह्याला सर्वांगीण विकासापासून वंचित ठेवण्याचे दुर्दैवी काम केले आहे. तथापि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा भार स्वीकारल्यानंतर विकास कामांचा धुमधडाका जाहीर करण्याचे काम ज्या जोमाने सुरु ठेवले आहे, त्यात कुठेही खंड पडू दिला नाही. निव्वळ घोषणांचा पाऊसच नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी उपलब्ध करुन त्यांचे शीघ्र पातळीवर वाटपही सुरु ठेवले आहे. उदाहरणच द्यायचे झाले तर शेतकऱ्यांच्या पिकांचे झालेले नुकसान भरुन देण्यासाठी जे प्रयत्न चालविले आहेत ते अगदी युद्ध पातळीवर सुरच ठेवले आहेत.
आतापर्यंत जेवढे मुख्यमंत्री म्हणून आले त्यांनी निधीची उपलब्धता तर सोडाच परंतु साध्या घोषणाही न करता केवळ आश्वासनांची पानेच तोंडाला पुसण्याचे काम केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी महाराष्ट्रातील अनेक भागांच्या विकासाचा समतोल राखला जावा यासाठी चे प्रयत्नही जोमाने चालविले आहेत. विकासाचा स्त्रोत असाच कायम सुरु ठेवला तर निश्चितच मराठवाड्यासह अवघा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही हे अगदी निक्षून सांगावे लागेल.
==========================
दैनिक चालु वार्ता चे परभणी जिल्हा उपसंपादक तथा ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय वामनराव कराळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एका अनाहुत पत्राद्वारे ज्या काही समस्या गा-हाण्याच्या रुपात विषद केल्या आहेत, त्यापैकी बऱ्याच समस्यांवर ना. शिंदे यांनी योग्य अशी पाऊले उचलून त्या समस्या मार्गी लावण्याचे पवित्र काम हाती घेतले आहे, त्यामुळे नक्कीच समस्त परभणी क्रांती शान पूर्ती वाढली जाणार आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते.
=======================