दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:- राम चिंतलवाड
मौजे वारंगटाकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयातआणि प्राथमिक जिल्हा परिषद शाळेत मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या आनंदात व उत्साहात साजरा करण्यातआलाआहे. ग्रामपंचायत कार्यालयातील पटांगणात महापुरुषाचे प्रतिमेचे प्रथम पूजन करून सरपंच सौ.मायाबाई दयाळगिर गिरी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यातआले.तर प्राथमिकरित्या जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा महात्मा गांधी, परमपूज्य डॉ.बाबासाहेबआंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केल्यानंतर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वांभर राणे यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यातआले.यावेळी पोलीस पाटील अवधूत कदम ,उपसरपंच बालाजी देवकते,आबाराव जोगदंड, प्रकाशराव हाके ,दयाळगीर गिरी ,विश्वांभर कानोटे ,मुंडे सर होते.तर शाळेतील कार्यक्रमात नीट परीक्षेमध्ये ७२०पैकी५४४ गुण घेऊन अव्वल पद्धतीने उत्तीर्ण झालेल्या गावातील विद्यार्थ्यांंचा व कुटुंबाचा सत्कार गांवकरीआणि शिक्षकांनी यावेळी केलाआहे.यामध्ये विद्यार्थी शिवराज साहेबराव हाके पाटील व त्यांचेआजोबा कोंडीबा हाके,आजी सिंधुबाई हाके,वडील साहेबराव हाके, काका बाबुराव हाके यांचा सुद्धा शाल, हार देऊन येतोचित्त सत्कार करण्यात आलाआहे.यावेळी शाळेतील शिक्षक चिखले सर,बडेवाड मॅडम,मनगिरे मॅडम,पूजाबाई जाधव,ज्योती राणे, शोभा चिंतलवाड,पत्रकार दत्ता पोपुलवाड,पत्रकार राम चिंतलवाड,संघपाल प्रधान,अरविंद कानोटे,पप्पू गिरी ,सुरज टोकलवाड यांच्यासह गावातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
