
दैनिक चालू वार्ता लोहा प्रतिनिधी- राम कराळे
अखिल भारतीय शैक्षणिक राष्ट्रीय शिक्षक महासंघाचे पश्चिम भारत राजस्थान, गुजरात,महाराष्ट्र व गोवा प्रभारी मा.शेखर चंद्रात्रे साहेब हे दि. 18/9/22रोजी नांदेड दौऱ्यावर आले असता नांदेडच्या नेताजी सुभाषचंद्र बोस कॉलेज येथे महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अनेक शैक्षणिक विषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्रा. शिक्षक महासंघाचे नेते जी. एस. चिटमलवार सर, शिक्षक महासंघाचे नांदेड जिल्हाध्यक्ष मा. हरिभाऊ चव्हाण सर, मु.अ.तथा शिक्षक महासंघाचे प्रांत उपाध्यक्ष हरिहरराव चिवडे, मुख्याध्यापक एच. जी. पवार मु.अ.एच. एस. भालेराव, मु.अ.तथा कोषाध्यक्ष माधवराव भोपाळे, सचिव बालाजी तांबुळे, सहसचिव एस.व्ही.चव्हाण आदी जण उपस्थित होते.