
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
भारत सरकारच्या वतीने “स्वच्छ अमृत महोत्सव ” आयोजित ‘इंडियन स्वच्छता लीग ‘ ची सुरुवात 17 सप्टेंबर रोजी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन पुणे महानगरपालिका, नेहरू युवा केंद्र, एन. एस. एस , एन. सी. सी , वर्षीप अर्थ फाऊंडेशन आणि शहरातील इतर सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करण्यात आले. पुण्यातील कात्रज लेक, रिद्धी सिद्धी घाट व तळजाई मंदिर या ऐतिहासिक ठिकाणी ही स्वच्छता मोहिम राबवण्यात आली .सुमारे 1500 नागरिक आणि स्वयंसेवक यांनीं अंदाजे 400 किलो कचरा गोळा केला.
सदर मोहिमेची सांगता पुण्यातील गणेश कला क्रिडा मंच, स्वारगेट येथे करण्यात आली. या कार्यक्रमात मा. खेमनार सर ( मनपा आयुक्त,पुणे महानगरपालिका ), मा. आशा राऊत ( उप-आयुक्त घन कचरा विभाग) , मा. डॉ. केतकी घाटगे ( सहाय्यक आरोग्य निरीक्षक घनकचरा विभाग, मनपा ), मा. डी कार्थिग्वेन सर ( रिजनल हेड ऑफ एन. एस. एस ), मा. यशवंत मानखेडकर सर (उपसंचालक नेहरू युवा केंद्र, पुणे ), मा. सत्या सर ( पुणेरी नायक टीम कॅप्टन ) तसेच पुणे महानगरपालिकेचे अन्य पदाधिकारी, सामाजिक संस्था, एन. एस. एस , एन. सी. सी स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम करून कार्यक्रमाची शोभा वाढवली व समाजप्रबोधन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आम्रपाली चव्हाण यांनी केले.