
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- गेल्या वर्षभरात अमरावती जिल्ह्यात १ जानेवारी ते १४ सप्टेंबर दरम्यान डेंग्यूचे ५४ रुग्ण आढळून आले आहेत.यासोबतच चिकनगुनियाचे ३५ आणि मलेरियाचे ४२ रुग्ण आढळून आले आहेत.गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा डेंग्यू आणि चिकनगुनियाची लागण रोखण्यात आरोग्य विभागाला मोठे यश मिळाले आहे.त्याचबरोबर मलेरियाच्या रुग्णांमध्येही किंचित वाढ होताना दिसत आहे.
२०२१ मध्ये जिल्ह्यात डेंग्यूचे २ हजार ३७३ संशयित रुग्ण आढळून आले होते त्यापैकी ३११ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.त्याचशिवाय चिकनगुनियाचे ४१ आणि मलेरियाचे ४२ रुग्ण आढळले आहेत.मात्र;चालू वर्षात १ जानेवारी ते १४ सप्टेंबर या कालावधीत २४७ संशयित रुग्ण आढळून आले आहेत.जन्मलेल्या ५४ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून यावर्षी चिकनगुनियाचे ३५ आणि मलेरियाचे ४२ रुग्ण आढळले आहेत.गतवर्षी पेक्षा जिल्ह्यात स्क्रबटायफसचा एकही रुग्ण आढळला नव्हता;परंतु विशेष म्हणजे यावर्षी पहिल्यांदाच जिल्ह्यात स्क्रबटायफसचे ६ रुग्ण आढळले आहेत.
वरील माहिती देताना जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.शरद जोगी म्हणाले की,गेल्या पंधरा दिवसांपासून हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे डेंग्यू,मलेरिया या आजारांची लागण वाढली आहे.
सध्यापरिस्थितीत डेंग्यू बाबतची परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असली तरी मलेरियामुळे स्थिती चिंताजनक सांगितली जात आहे.