
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार:-बारूळ येथे शंकरराव बनसोडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्था बारूळ यांच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्रात मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व सर्व रोग निदान रुग्ण तपासणी व रक्तदान शिबिर घेण्यात आला होता यास उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला
येथील शंकराव बनसोडे बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी विविध सामाजिक आरोग्य शिबिर घेण्यात येतात यावर्षी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया रक्तदान शिबिर तसेच सर्व रोग निदान शिबिर बारूळ घेण्यात आला यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटक पोलीस सहाय्यक निरीक्षक पी डी भारती तर प्रमुख पाहुणे मध्ये जिल्हा कोषागार अधिकारी सौ.ज्योती बगाटे , वैद्यकीय अधिक्षक मुखेड डाँ सुधाकर तहाडे,डाँ.बालाजी तुप्पेकर,डाँ. अश्विनी देसाई ,डाँ.वाय.एच.चव्हाण,डाँ.योगेश दुल्लेवाड उपस्थित होते यावेळी मोतीबिंदू शस्त्रक्रिया 219 रुग्णांची तपासणी करण्यात आली तर यावेळी स्वयपूर्ती रक्तदात्यांनी रक्तदान केले तर सर्व रोग निदान यावेळी 600 रुग्णांची तपासणी करण्यात आली यावेळी रक्त संकलन करण्यासाठी डॉक्टर शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांचे सहकार्य लाभले दरवर्षीच्या या शिबिदास यंदाही रुग्णांनी सहभाग मोठ्या प्रमाणात घेतला व गोरगरीब कष्टकरी रुग्णांना यावेळी या सेवाभावी संस्थेच्या वतीने आधार मिळाले या कार्यक्रमासाठी सेवाभावी संस्थेचे सचिव डॉ सदाशिव बनसोडे मेजर माधव सुरुमवाड कमलाकर पाटील वडजे बाळू पाटील कोल्हे गोविंद शिंदे शिवलिंग स्वामी प्रल्हाद बनसोडे अमोल राहते विजय लोहबंदे तुकाराम टोम्पे गणेश गजभारे लक्ष्मण वाघमारे प्रदीप कदम आदींनी परिश्रम घेतले.