
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
शक्यतो स्वतः हुन कोणाला पोहायला येत नाही.कोणीतरी सहकार्य केल्यानंतर आपण पोहयला शिकतो.महणजेच आपल्याला पोहायला शिकविण्यासाठी कोणाचा तरी सिंहांचा वाटा आहे .हिच बाब आपल्या जीवनात पण जशास तशी लागु पडते. आपण घडलो म्हणजे स्वतः घडलो असं नाही . आपल्याला घडविण्यासाठी कोणीतरी झिजलेल असतं .जीवनाच्या वाटेवर क्षणोक्षणी पावलोपावली आपल्या वेगवेगळ्या पद्धतीचे सहकार्य मदत मार्गदर्शन आवश्यक असतं. आणि कळतं न कळत हि मदत सहकार्य मार्गदर्शन आपल्याला कोणीतरी करत असत. अनेकांचं जीवन घडविण्यासाठी अनेकांचा सिंहांचा वाटा असतो . कोणत्याही क्षेत्रात आपण जेव्हा घडत असतो. तेव्हा आपल्याला घडविण्यासाठी कोणीतरी झिजत असतं.आपली सगळी शक्ती पणाला लावून आपल्याला घडवत असतं.मग आपल्याला ज्यांनी घडवलं त्यांचं अजिवन ऋणी असणं हि आपली नैसर्गिक नितिमत्ता असते .पण सध्याच्या काळात ज्यांनी आपल्याला घडविण्यासाठी प्रयत्न केला.किंवा जीवनाच्या समुद्रात पोहायला शिकवले सर्व प्रथम त्यालाच बुडविण्यासाठी आपण आतुर असतो उतावीळ असतो.हा वेळेचा प्रभाव आणि काळाचा महिमा आहे.
ऋण हे अजिवन व्यक्त करण्यासाठी ऋणी राहण्यासाठी असतं पण सध्या असं घडताना दिसत नाही.गरज सरो वैघ मरो या पद्धतीने लोक आचरण करत आहेत . जीवन जगत असताना किंवा जीवनाची नौका पैलतीराला घेऊन जात असताना आपल्यावर कळत न कळत अनेकांच ऋण असतं .पण आपण त्यापैकी किती लोकांचे प्रमाणिक ऋणी राहतो . खुप लोक सापडतील जे ऋण विसरत नाहीत. जीवनात ज्यांचे आपण ऋणी आहोत त्यांचं ऋण हे शक्यतो फेडल पाहिजेच . परंतु बहुतांश लोक ऋण फेडण्या ऐवजी ज्याचे आपल्यावर ऋण त्यांनाच डुबविण्यासाठी उतावीळ असतात .
आपलं कोणा मुळे कल्याण झाल .आपण कोणा मुळे योग्य मार्गावर चाललो . जीवनाच्या समुद्रातील अनेक ठिकाणी आपण कोणाच्या मार्गदर्शनाखाली घडलो यशस्वी झालो . किंवा मार्गक्रमण केले त्या मार्गावरील सर्व म्हणजे ज्यांच्या ज्यांच्या कडुन आपण जीवनात जे जे शिकलो . त्या प्रत्येक मार्गदर्शक, सहकारी किंवा अज्ञात यांचं आपण ऋणी असलच पाहिजे.हिच नितिमत्ता असते.आणि शेवटी सगळ्या बाबतीत आपल्याला सहकार्य करणारा निसर्ग या सर्वांच्या प्रति आपण कृतज्ञ असलं पाहिजे.याला नैसर्गिक सिद्धांत आणि नियमानुसार नितिमत्ता असं महटल जात . आणि नितिमत्ता हि जोपासलीच गेली पाहिजे. पण सध्याच्या परिस्थितीत वेळेचा प्रभाव आणि काळाचा महिमा अशा पद्धतीने वाढला आहे कि नितिमत्ता हि पायदळी तुडविण्यासाठीच आहे.आणि दगा फटका , बेइमानी, खोटेपणा,अनिति ने आचरण झटपट मोठं होण सगळे नियम तत्व नैतिकत्ता पायदळी तुडवून पुढे धावत रहण म्हणजेच जीवन आहे असा समज झालेला आहे.पण चांगल्या वाईट कार्याचा फळ हे योग्य वेळी नक्कीच मिळत.परंतु ती वेळ निघुन गेलेली असते . पश्चात्ताप करण्यासाठी सुद्धा वेळ राहत नाही . म्हणून ज्या पद्धतीने आपण पुढे जातोय, अगदी आपल्याला ज्यांनी घडवलं किंवा जीवनाच्या समुद्रात पोहायला शिकवले . त्याच व्यक्तिला सर्व प्रथम बुडविणे हे भायनक असं वास्तव आहे. आपल्याला करणारा हा दाता असतो कारण त्याने आपल्याला सहकार्य केलेले असते . प्रतिष्ठा मिळवून देऊन यशस्वी होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतलेली असते . आपल्या यशस्वी होण्या मध्ये त्याने आपली सगळी शक्ती पणाला लावलेली असते. आपल्यावर विश्वास ठेवुन महत्व देऊन जबाबदारी टाकलेली असते व नेतृत्व करण्याची संधी दिलेली असते. आपल्याला पुढे आणण्यासाठी आणखी जे जे शक्य आहे ते सर्व केलेले असते . नेमकं त्याच व्यक्तीला आपण सर्व प्रथम आपल्या शत्रू यादीत समाविष्ट करून संपविण्यासाठी आपली सर्व शक्ती पणाला लावतो . किंवा त्या व्यक्तिच अस्तित्व संपविण्यासाठी उतवीळ असतो . अहोरात्र धडपड प्रयत्न करतो असतो .मग हे नेमकं आपण कोणत ऋण फेडतो. हा असणारा वेळेचा प्रभाव आणि काळाचा महिमा आपल्याला ओळखून आचरण करता आले.तर मग नक्कीच आपलं हित झाल्याशिवाय राहणार नाही. शेवटी नैसर्गिक न्याय हा महत्वाचा असतो. आणि अंतिम विजय हा नियतीच्या बाजुने असतो . फक्त वेळ लागतो आणि त्या वेळीची वाट पाहण्याची क्षमता हि पोहायला शिकावणारा मध्ये नक्कीच असते. जीवनातील विविध क्षेत्रात आपण कार्य करत असताना आपल्या सहवासातील संपर्कातील व्यक्तिला आपण घडविण्यासाठी प्रयत्न करत असतो . दैनंदिन जीवन जगत असताना अनंत अडचणी समस्या असतात ह्या सगळ्या समस्या अडथळे पार करत करत पुढे जावं लागतं.पुढे जाताना प्रत्येक टप्प्यावर वळणावर आपल्याला अनेकांनी सहकार्य केलेले असते . किंवा आपण अनेकांना सहकार्य केलेले असत. आपल्याला ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या बद्दल आपल्या मनात आज कोणता भाव आहे.तोच भाव महत्वाचा आहे . म्हणून आपल्याला ज्यांनी ज्यांनी घडविण्यासाठी सहकार्य केले त्यांच्या बद्दल सदैव कृज्ञन असणं हे उत्तम नितिमत्तेच लक्षण आहे .आणि हे ज्याचं लक्षण आहे तो व्यक्ति सध्या तरी महान आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.तो गरीब श्रीमंत कोण आहे याला महत्त्व नाही.तर आपल्याला ज्यांनी सहकार्य केले घडविले त्यांच्या प्रति आचरण कस आहे हे जीवनातील सगळ्यात महत्वाचे मुल्यमापन आहे. आपल्या घडविण्यासाठी प्रयत्न करणारे जे जे ज्ञात अज्ञात आहेत . त्यांना संपवण्याचा प्रयत्न करण्या ऐवजी कृतज्ञता व्यक्त करून आजीवन ऋणी राहण खरया अर्थाने मोठे पणाचे माणुसकीचे लक्षण आहे . आपल्याला ज्यांनी ज्यांनी घडवलं किंवा घडविण्यासाठी यथा योग्य योगदान दिले .त्या सर्वांचे प्रति आपण प्रमाणिक ,कृतज्ञ,ऋणी असणं नैसर्गिक न्याय, सिद्धांत,नितिमत्ता, जोपासणारा लक्षण आणि वृत्ती आहे. हि वृत्ती जोपसण सात्विक मनोवृत्ती च लक्षण आहे. आणि सर्व उत्कृष्ट माणसाचं लक्षण आहे.महणुन आपल्याला घडविण्यासाठी प्रयत्न करणारला बुडविण्यासाठी उतावीळ अधीर असण्या ऐवजी सदैव ऋणी आणि कृतज्ञ असणं कधिही उत्तम व्यक्तिमत्वाच लक्षण आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301