
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
मौजे अटकळी ग्रामपंचायत कार्यालय येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा निजामशाहीच्या राजवटितुन मराठवाडा 17 सप्टेंबर1948 रोजी स्वातंत्र्य झाला तेव्हापासून 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो
सविस्तर वृत्त असे की अटकळी ग्रामपंचायत कार्यालय समोर सकाळी 8 वाजता महापुरुषांच्या प्रतीमांना डॉ बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस यांना दिपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर अटकळी गावातील सरपंच श्रीमती पुष्पाताई घोडके उपसरपंच रणवीर डोंगरे ग्रामसेवक हंबीरे साहेब बजरंग बत्तलवाड चेअरमन शिवाजी डोंगरे जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दाडे सर किशोर माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक अटकळे सर आदि उपस्थित राहुन महापुरुषांना अभिवादन करण्यात आला अटकळी येथील माजी सैनिक सुभाष मारोती कदम यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आला.ध्वजारोहण झाल्यानंतर गावातील प्रतिष्ठित नागरिक यांचा सन्मानपूर्वक सत्कार समारंभ पार पडला शासनाने राबवलेल्या सन 2000-2001 भारत अभियानातुन स्वच्छता अभियान अंतर्गत झाडु घेऊन मुख्य रस्त्यावर व ग्रामपंचायत कार्यालय समोर स्वच्छता अभियान उपक्रम राबविला होता अशा प्रकारे विविध उपक्रम अंतर्गत एक आगळा वेगळा उपक्रम ग्रामपंचायत कार्यालय तर्फे ठेवण्यात आला प्रतिष्ठित नागरिक सेवा सहकारी सोसायटी सर्व सदस्य युवा वर्ग अंगणवाडी सेविका आशा वर्कर जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी व विद्यार्थीनी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित राहुन आयोजित केलेल्या उपक्रमात सहभाग नोंदवला होता.