
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
आलेगाव :- कंधार तालुक्यातील आलेगाव येथील ग्रामपंचायत निवडणूक प्रथमच जनतेतून सरपंचाची निवड झाली असून या निवडणुकीत येथील जनतेने तरूण तडफदार उच्च विद्याविभूषित प्रा. डॉ. श्री. बळवंतराव वर्ताळे पाटील यांना निवडून दिले आहे. गुरुवर्य आनंद गिरी महाराज पॅनलला सरपंच पदी विराजमान केले आहे. या निवडणुकीत प्रस्थापित सत्ताधारी विरोधात तरूण तडफदार अशी लढत झाली. युवकांना गावामध्ये विकास कामे करण्यासाठी जनतेने निवडून दिले आहे. या निवडीबद्दल सरपंच व युवकांचे सर्व गावकऱ्यांनी विजयी झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.