
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
जालना जिल्ह्यातील दीड हजार युवकांना लवकरच रोजगार उपलब्ध करून देण्यासह जालना शहराच्या विकासासाठी लागेल तेवढा कोट्यवधी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडून मिळवून देणार, अशी ग्वाही अर्जुन खोतकर यांनी दिली. अल्पावधीतच मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना – भाजप युती सरकारने सुमारे साडेसातशे जीआर काढून आपले सरकारच खऱ्या अर्थाने लोकाभिमुख असल्याचे दाखवून दिले असल्याचेही स्पष्ट केले.
मुंबई येथील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यास मोठ्या संख्येने शिवसैनिकांना उपस्थित राहता यावे यासाठी आज अर्जुन खोतकर यांच्या निवासस्थानी व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री प्रा. सुरेश नवले बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी बोलताना अर्जुन खोतकर म्हणाले की, आपण बैठकीचे आयोजन केले आणि त्यास मेळाव्याचे स्वरूप प्राप्त झाले. शिवसेनाप्रमुखांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय होणार अशी चर्चा सुरू झाली तेव्हा शिवसेनेची पहिली विक्रमी सभा आपण जालन्यात घेतली होती. लाखांच्या सभा घेणे आपल्यासारख्या खंबीर कार्यकर्त्यांच्या पाठबळावर अवघड वाटत नाही. विरोधकांच्या भूलथापांना कार्यकर्त्यांनी बळी पडू नये असे आवाहन करताना अर्जुन खोतकर म्हणाले की, जालन्यात पाणी आम्ही आणले आणि दुसराच कोणीतरी स्वतःला जलसम्राट म्हणून घेतो. जालन्यासाठी अद्याप मेडिकल कॉलेज मंजूर झालेले नाही. असेल तर त्यांनी मंजुरीचे पत्र दाखवायला हवे. पण तसे न करता केवळ होल्डिंग लावून आपली शेखी मिरवून घेत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज स्थापन करण्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यासाठी राज्य सरकारची अनुमती लागते. लवकरच मुख्यमंत्र्यांकडून मेडिकल कॉलेजची मंजुरी मिळविली जाणार आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे आणि आपण मिळून त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. जे केवळ जालन्याच्या विकासाच्या गप्पा मारतात त्यांना पालिकेची सभा घेण्यासाठी साधे सभागृह बांधता आलेले नाही. दुसरीकडेच सभा आयोजित कराव्या लागतात. शहरातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. दहा दहा दिवस केवळ नियोजन नसल्यामुळे जालनेकरांना पिण्याचे पाणी मिळू शकत नाही. एक वर्षापासून मूर्तीवेसचा रस्ता बंद आहे. स्विमिंग पूल लाखो रुपये खर्च केलेला असूनही बंद आहे. फुलंब्रीकर, महावीर नाट्यगृहाची दुरावस्था झालेली आहे, संभाजी उद्यानाची दुर्दशा झाली आहे. घनकचरा प्रकल्प अर्धवट आहे. जालन्याची ज्यांनी वाट लावली ते जलसम्राट नसून टक्केवारीसम्राट असल्याचा टोलाही अर्जुन खोतकर यांनी लगावला. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युती सरकारने विकासाचा धडाका लावला आहे. सरकार स्थापनेनंतर अल्पावधीतच सरकारने तब्बल साडेसातशे जीआर काढून महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत. ७५ वर्षावरील वृद्धांना एसटीने मोफत प्रवास, शेतकऱ्यांना दोन ऐवजी तीन हेक्टर पर्यंत आर्थिक मदत, जालना पाणीपुरवठा योजनेसाठी ४८ कोटीचा निधी, अंबडच्या मत्स्योदरी देवीसाठी ९८ कोटी, राजुर गणपतीसाठी २४ कोटी, अंबड पालिकेसाठी १५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. हातवन तलावाचे कामही लवकरच सुरू होणार आहे. जालना शहरासह जिल्ह्याच्या विकासासाठी आपण आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे एकत्र प्रयत्न करून मोठा निधी मिळवू अशी ग्वाही दिली. यावेळी अभिमन्यू खोतकर, भाऊसाहेब घुगे, पंडीत भुतेकर, मोहन अग्रवाल, बाबासाहेब इंगळे, भाऊसाहेब पाऊलबुदे, सुनील किनगावकर, परसराम यादव, आलम खान पठाण, फिरोजलाला तांबोळी, दत्तात्रय चव्हाण, संतोष मोहिते, आत्मानंद भक्त, मेघराज चौधरी, अमोल राऊत, अमोल ठाकुर, गणेश मोहीते, अजय कदम, भरत गव्हाणे, भगवान सुरुंग, भुषण शर्मा, जावेद भाई, जफरखान, नजीर भाई, मेहमूद कुरेशी, अँड सुरेश कुलकर्णी, अँड किशोर राऊत, डॉ. सुधाकर नेमाणे, डॉ. चव्हाण, सविताताई किवंडे, विजयाताई चौधरी, दुर्गाताई देशमुख, जर्हाडताई, शोभाताई खोत ,कालिंदाताई ढगे, माधव टकले गणेश गोरे, पांडुरंग डोंगरे, जनार्दन चोधरी, सुनिल कांबळे, बाबा मोरे, रामेश्वर वाढेकर, अरुण जाधव, काशीनाथ जाधव, भगवान अंभोरे, भागवत काळे, प्रभाकर विटेकर, प्रशांत वाढेकर, सुधाकर वाढेकर, गोपी गोगडे, संतोष जांगडे, किशोर पांगारकर, राजु माधवाले, संताजी वाघमारे, राम सतकर, रमेश टेकुर, योगेश रत्नपारखे, सुशिल भावसार, नागेश डवले, दिपक वैद्य, विक्रम कुसुंदल, बडेखान पठाण शेख, एकनाथ जायभाये, महादु गिते, निवृत्ती डाके, माऊली गवारे, नजीरभाई, कैलास काजळकर, गणेश सुपारकर, दिनेश भगत, कमलेश खरे, मनोज लाखोले, गणेश वल्लाकट्टी, अक्षय वल्लाकट्टी, गजानन तौर, संजय डुकरे, किशोर शिंदे, मुसा परसुवाले, महादु गायकवाड, तायर खान पठाण, बडे खान पठाण, कैलास चिरके, रामेश्वर पडोळ, किसन राठोड, शिवाजी जाधव, ब्रह्मा वाघ, संजय वाघ, शाहू खंदारे, निवृत्ती साबळे, विठ्ठल टेकाळे ,देविदास सौमधाने, गणपत धोत्रे, प्रभाकर सुळसुळे, राहुल गवारे, रवींद्र ढगे, नारायण ढगे, अशोक ढेंगळे, गजानन कळकुंबे, सोपाण कावले, बाबासाहेब जर्हाड, भगवान भीसे, बबन मगरे, शिवाजी जर्हाड व शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.