
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी पुणे-संभाजी गोसावी
पुणे. बारामती शहर पोलीस ठाण्यांच्या कर्तव्यदक्ष महिला पोलीस अंमलदारांचे अकाली निधंन शितल जगताप गलांडे मॅडम या बारामती शहर पोलीस ठाण्यांत कार्यरत होत्या. काही दिवसांपासून त्या प्रसूती रजेवर गेल्यानंतर प्रसूतीनंतर त्यांना डेंगू आजारांची लागण झाल्याने त्यांचे आज पुणे येथील के.एम रुग्णालयांत अकाली निधंन झाले.त्यांच्या निधनांमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये शोककळा पसरली. शितल मॅडम या बारामती शहर पोलीस ठाण्यांची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या प्रस्तुतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यांतील दैनंदिन कामकाज पाहत होत्या पोलीस दलांचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लावून काम करणाऱ्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या व पोलीस ठाण्यांतील वातावरण कायम प्रसन्न ठेवण्यांमध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. अशा हसत-मुख प्रसन्न व्यक्तिमत्त्वांचे अकाली निधनामुळे पुणे ग्रामीण पोलीस दलामध्ये शोककळा पसरली त्यांच्या दुःखांमध्ये पुणे ग्रामीण पोलीस दल व बारामती शहर पोलीस ठाणे सहभागी आहे त्यांच्या पश्चांत पती एक मुलगी आणि काही दिवसांपूर्वी जन्मलेले लहान बालक असा त्यांचा परिवार आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव जी देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे बारामती शहर पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्यासह सातारा जिल्ह्यांचे पत्रकार श्री. पुरीगोसावी यांनी दुःख व्यक्त केले.