
दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिध -सौरभ कामडी
भरपावसात आंदोलन सुरू आंदोलन कर्ते मागण्यांवर ठाम..
अनुसूचित क्षेत्रातील शिक्षक भरती करण्यासाठी आदिवासी डीएड,बीएड कृती समिती मार्फत (दि.१९) सप्टेंबर पासून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन सुरू केले आहे. आज या आंदोलनाचा दुसरा दिवस असून ही आंदोलन चालू आहे. वित्त विभागाची मंजुरी व मंत्रिमंडळ मान्यता देणे, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा आयोजन करणे, पालघर जिल्ह्यातील ४७८ बदली शिक्षकना कार्यमुक्त करणे. या आदी मागण्यासाठी दुसऱ्या दिवशीही बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे.
शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी आंदोलन कर्त्याना मंत्रालयात चर्चेला बोलावून विषय समजून घेतला तसेच लवकर करण्याचे आश्वासन दिले. यावेळी आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेश पाटील, आमदार क्षितिज ठाकूर, समितीचे शिष्टमंडळ उपस्थित होते. आंदोलन कर्ते आंदोलनावर ठाम असून मागण्या मान्य कराव्यात अन्यथा आंदोलन तीव्र स्वरूपात होईल असा इशारा समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
दामू मौळे(अध्यक्ष)
“किती वेळेस आंदोलन,उपोषण करायची आदिवासींना द्यायचं नसेल तर तस सांगा.भर पावसात आंदोलन चालू आहे दखल घेतली जात नसेल तर येत्या ग्रामपंचायत निवडणूकित बहिष्कार टाकून निषेध व्यक्त करण्यात येईल.”