
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे
देगलूर–
कोरोनाच्या दीड दोन वर्षाच्या कठीण काळाने सर्वात जास्त नुकसानी केली ती आपल्या लेकरांची व त्यांच्या शिक्षणाची… Online शिक्षणामुळे आपली मुलं मोबाईलवर शिकलीही असतील थोडफार.. पण मिळालेल्या माहितीपेक्षाही ही मुलं त्या मोबाईलच्या कधी आहारी गेले हे आपणाला कळालंच नाही. म्हणून तर आज ही लेकरं मोबाईल अन् टिव्हीला चिटकून बसली आहेत. आज आपल्या मुलांना जेवतानाही मोबाईल लागतोय. अनेक लेकरं तर मोबाईल लावल्याशिवाय खात नाहीत हे आपण अनुभवतो आहोत. हे खूप भयंकर आहे. या नव्या व्यसनांमुळे लेकरांचे भावविश्वच बदलले आहे. मुलं एकलकोंडी होत आहेत, पालकांशी संवाद कमी झालाय. अन् यातून वाढत जाणारी चीडचीड (Irritaion), हट्टीपणा यामुळे कुटुंबात भयाण वाद होत आहेत. मोठी मुलं तर धूम्रपान, मद्यपान व इतर वाईट व्यसनांच्या नादी लागत आहेत. *या सर्व समस्येंचे मूळ लेकरं व पालकांना लागलेल्या व्यसनांमध्ये आहे.* बापाच्या दारू व इतर व्यसनांमुळे जेवढे नुकसान झाले त्यापेक्षाही जास्त नुकसान या नव्या व्यसनांमुळे होत आहेत. याबाबत आपण आतातरी विचार करणार आहोत का नाही…?
आता लेकरांना यातून बाहेर काढण्यासाठी त्यांना घराबाहेर काढून वेगवेगळ्या उपक्रमात गुंतवले पाहिजे. त्यांना सतत क्रियाशील ठेवले पाहिजे. तो प्रयत्न आम्ही करत आहोत.
आम्ही (विश्व परिवार व Vishwa Public School) याबाबत खूप दिवसांपासून विचार करून देगलूर व परिसरातील विद्यार्थी, पालक व शिक्षकांसाठी एक महत्वाचा कार्यक्रम दि. 2 आक्टोंबर रोजी देगलूर येथे आयोजित करण्याचे नियोजन करत आहोत. यासाठी पुणे व नांदेडहून मानसोपचार तज्ञ व शिक्षणतज्ञ निमंत्रित करत आहोत.
म्हणून आपल्या लेकरांना व पालकांना यातून बाहेर काढण्यासाठी आपण मिळून प्रयत्न करूया. यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या पालकांनी, शिक्षकांनी, प्राध्यापकांनी व तरूणांनी कैलास येसगे यांच्याशी संपर्क साधावा.