
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
जोशीसांगवी :- कंधार तालुक्यातील जोशीसांगवी ते तेलंगवाडी रस्त्यावरील जोशीसांगवी च्या गावाजवळील पुल अत्यंत जूना असून तो मुसळधार पावसामुळे वाहून गेला आहे. हा पुल अनेक वर्षापासून नादुरूस्त असून चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे होत्याचा नव्हता झाला आहे. शाळेतील विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागतो आहे. पालकांना आपल्या मुलांना पुलाच्या पाण्यातून पलीकडील नदीकाठी नेऊन सोडावे लागतआहे.विद्यार्थ्याना शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतआहे.या पुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असून लोकप्रतिनिधींनी या पुलाकडे लक्ष देऊन पुलाचे बांधकाम पूर्ण करून द्यावे अशी मागणी जोशीसांगवी व तेलंगवाडी येथील विद्यार्थी व पालकांनी प्रशासनाला केली आहे.