
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
समुद्रा कितीही खवळला तरी नावाडी परफेक्ट असेल तर नौका पैलतीराला जाणारच तसंच जीवनात कितीही वादळं संकट अडचणी समस्या आल्या तरी आपल्या मनातील त्रास दायक बाबी विसरायला शिकल तर आयुष्यच गणित परफेक्ट बरोबर जुळत . म्हणून मनात साठवण सोपं असतं पण विसरण हे अवघड असतं आणि हेच कठिण अवघड काम ज्याला जमलं त्याला जीवन प्रभावित करू शकत नाही.आपलं मन हे आपलं हितकारक आहे .तसेच ते अहितकारक आहे.मन आपला मित्र आहे.तर हेच मन आपलं पण शत्रु आहे.सदैव, चंचल अस्थिर अनियंत्रित असणार मन हे जगातील सगळ्यात मोठे भांडार आहे. ज्या मध्ये सृष्टी वरील सगळ्या चांगल्या आणि वाईट बाबी एकत्र साठविल्या जातात.आणि मनाची विशालता एवढी मोठी आहे कि कितीही साठवलं तरी जगा अपुरी पडत नाही .मग आपलं मन हे किती मोठं भांडार ,कोठार आहे .याची कल्पना करणं आज पर्यंत तरी कोणाला जमलं नाही .पण या कोठारात आपण काय साठवले हे आपल्याला साठवताना लक्षात येत नाही कळत नाही.पण जेव्हा परिणाम जाणवतात तेव्हा मग आपण चिंतन करतो आणि मग लक्षात येतं की आपली साठवण करण्यात गडबड झाली आहे.मग भांडारात जगा खुप शिल्लक आहे.महणुन काहीही साठवायचे का ?तर नक्कीच नाही. कारण या साठवणूकीमुळे आपलं चांगलं जीवन प्रभावित होत.महणुन सगळ्यात प्रथम आपल जीवन आपल्याला प्रभावित होऊ देयच नसेल तर आपल्या मनात काय साठवायचे आणि नेमकं काय विसरायचे हि कला कौशल्य,हे ज्ञान आपल्याला अवगत झाले पाहिजे . जेणेकरून कोणत्याही बाबींचा प्रभाव आपल्या जीवनशैलीवर होणार नाही.आणि आपलं जीवन प्रभावित होणार नाही. हि दक्षाता काळजी जवळपास प्रत्येकाला घेता आलीच पाहिजे जीवन जगताना अनेक विषय बाबी अशा असतात कि त्या मध्ये आपली इच्छा असली काय किंवा नसली काय तरी सुद्धा आपल्याला नाईलाजाने का होईना पण अनेक बदल हे स्वीकारावे लागतात. अनंत अडचणी ,नानाविध दुःख , निसर्गाचा अन अपेक्षित कहर,मायावी जगातील , दगाफटका अशा अनेक कारणांमुळे जीवन सतत प्रभावित होत असतं. अनंत असे विषय असतात कि त्यामुळे आपलं जीवन प्रभावित होत. म्हणून आपल्या मनात नेमकं काय साठवायचे आणि नेमकं काय विसरायचे हे ज्याला योग्य पद्धतीने जमलं त्याच्या जीवन प्रभावित होऊन शकत नाही . मुळात आपण इतरांच्या संदर्भात कसं वागावं हे खुप महत्वाचे आहे .आणि यावरच आपलं जीवन प्रभावित होत असतं .कोणावर किती विश्वास,कोणाला किती महत्व द्यायचे, कोणाला किती जवळ ठेवायचा,कोणासोबत किती जवळीकता असली पाहिजे.कोणाच महत्व कितीअसल पाहिजे ,हे समजलं पाहिजे.कारण पुढं उद्भवणारा त्रास सुद्धा या बाबींमुळे होत असतो.कारण त्या दिलेल्या महत्वाचं योग्य मुल्य मिळालं नाही.किंवा चुकीच्या ठिकाणी चुकीचे मुल्यमापन झाले तर मग नको तो त्रास होयला सुरुवात होते . या मध्ये काही दुमत नाही.महणुन निर्णय चुकला नाही पाहिजे.आणि जरी चुकला तरी तो तात्काळ दुरूस्त करता आला पाहिजे.किंवा आपलं जीवन प्रभावित होणार नाही एवढी दक्षाता घेता आली पाहिजे. किंवा जास्तीत जास्त गंभीर परिणाम चुकीच्या निर्णयाचे होऊ न देणे हेच जीवनातील महत्वाचे ज्ञान आहे. म्हणून मग व्यवहार कोणताही असु द्या सार्वजनिक क्षेत्रातील असो कि खाजगी क्षेत्रातील सार्वजनिक जीवनातील असो किंवा व्यक्तिगत पातळीवरील असो .आपलं ,ज्ञान,आपली ,समज, आणि आपली मर्यादा,आपली रक्षक असते.महणुन आपण जगात फिरताना वावरताना अनेक बाबी पाहतो अनुभवतो अनेक चांगले वाईट दृष्य पाहतो . विचार ऐकतो .जे ऐकलं पाहील अनुभवलं ते सगळंच आपल्या साठी चांगलं असतं असं नाही काही चांगलं असतं काही वाईट असतं काही भयानक असत तर काही महा भयानक असत .आता यापैकी जे चांगलं आहे .ते आपल्यासाठी हितकारक असते ठरेल म्हणून ते मनात साठवण उत्तम पण जे आपल्या साठी आपल्या भावी जीवनासाठी अहितकारक असेल आपलं जीवन प्रभावित करणार ठरेल किंवा ठरू पाहत आहे मग ते मनात साठवण योग्य नाही.ते आपल्याला वेळीच विसरता आल पाहिजे. जेणेकरून आपल व्यवस्थित जीवन प्रभावित होणार नाही.महणुन आपलं जीवन प्रभावित होऊ देयच कि नाही हे सर्वस्वी आपल्यवर अंवलबुन असतं .नको असलेलं आपण साठवतो . आणि आवश्यक असलेल विसरतो .हा मानवी स्वभाव पण एकंदरीत असं न करतां आपल्याला जीवनाला प्रभावित करणार्या बाबी ह्या आपल्याला मनातुन विसरता आल्या पाहिजेत त्यासाठी फार मोठी गोष्ट करण्याची आवश्यकता नाही मन सकारात्मक बाबी मध्ये व्यस्त ठेवा . चांगल्या विचारांच्या चांगल्या व्यक्तिच्या संपर्कात रहा . नक्कीच सकारात्मक परिणाम दिसतील या मध्ये शंका नाही. आणि ज्ञान हा तर यावरील सर्वतम प्रभावी उपाय आहे.
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज इतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर आध्यत्मिक मार्गदर्शक 9011634301