
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
=====================
औरंगाबाद:- देशा अंतर्गत दळवण व परिवहन हे सर्वश्री वाहन चालक अवलंबून आहे.उन,वारा,पाऊस,सर्दी,गर्मी किंवा कोरोना सारखी महामारी असो कुठल्याही परस्थिती मधे वाहन चालकांना आपल्या घरा मधे थांबून राहता येत नाहि.ज्या दिवशी ड्रायव्हर थांबेल त्या दिवशी देश थांबेल,देशाची अर्थ व्यवस्था थांबेल आसे म्हटले तर ते फारसे चुकीचे देखील ठरणार नाहि.असे येवढे मोठे योगदान चालक वर्गाचे आहे.तरी देखील हा वर्ग शासकीय योजने पासून वंचीत आहे,मान सन्मानाचा व ड्रायव्हर लोकांचा तर दूरदूर पर्यंत काहिच आसा संबंध येत नाहि.
महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त मुंबई डाँ श्री अविनाश ढाकणे यांनी दि.14/9/2022 रोजी एक परिपत्रक काढून सर्व प्रादेशिक परिवहन अधिकारी,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी तसेच सर्व परिवहन नियंत्रक अधिकारी यांना सुचीत केले होते की दि.17 सप्टेंबर वाहन चालक दिनाच्या औचित्याने सर्व सिमा तपासणी नाके व महत्वाच्या ठिकाणी वाहन चालकांना पुष्प गुच्छ देऊन यथोचित सन्मान करावा.
वरील आदेशाच्या अनुषंघाने आज दि.20/9/2022 रोजी डाँ सौ.अनिता जमादार पोलीस अधिक्षक परिक्षेत्र औरंगाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक कार्यालय महामार्ग सुरक्षा पथक औरंगाबाद येथे मराठवाडा विभाग प्रमुख सौ.नंदिनी चानपुरकर मँडम महामार्ग पथक उपविभाग औरंगाबाद यांचे शुभहस्ते जय संघर्ष संस्था प्रणित जय संघर्ष वाहन चालक, चालक मालक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री संजय हाळनोर यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.प्रसंगी महामार्ग सुरक्षा पथकातील सौ.अरूणा घुले मँडम सहाय्यक पोलीस निरिक्षक महामार्ग सुरक्षा पथक औरंगाबात,तसेच श्री प्रकाश जाधव साहेब पोलीस उपनिरिक्षक महामार्ग सुरक्षा पथक औरंगाबाद आणि सेवानिवृत पोलीस उपनिरीक्षक महामार्ग सुरक्षा पथक आलमगीर शेख साहेब उपस्थीत होते.
श्री संजय हाळनोर यांचेसह जय संघर्ष ग्रुपचे जि.अध्यक्ष श्री लक्ष्मण सोनवणे,श्यामकांत उचित,शहर अध्यक्ष सुनिल आप्पा लिंगायत,संतोष हाळनोर,MTDC ग्रुपचे उपाध्यक्ष सैय्यद अश्पाक,सुनिल क्षीरसागर,शेख सालेख,शेख सुमेर,सतीष मस्के व राजूभाऊ इत्यादी वाहन चालकांचा पण सत्कार करण्यात आला.
श्री आलमगीर शेख साहेबांनी उपस्थीत चालकांचे अभिनंदन करूण सर्वांचे आभार मानले.