
दैनिक चालु वार्ता मोखाडा प्रतिनिधी-सौरभ कामडी
पालघर जिल्ह्यातील उपक्रम शिक्षक श्री. दिपक शनवारे यांना शिक्षण भूषण पुरस्काराने सन्मानित वाडा तालुक्यातील करंजपाडा शाळेतील सहशिक्षक श्री, दिपक नवसू शनवारे त्यांच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रेरणादायी योगदानाबद्दल रयतेचे कैवारी शिक्षक भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रातील एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा कैवारी आयोजित प्रतिष्ठित समजले जाणारे रयतेचे कैवारी शिक्षण भूषण, रयतेचे कैवारी जीवन गौरव, रयतेचे कैवारी विशेष सेवा गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.
दैनिक रयतेचे कैवारीच्या ‘तृतीय वर्धापनदिनाचे औचित्याने रायगड जिल्ह्यातील पनवेल येथील बापूसाहेब डी डी विसपुते येथे आदर्श शैक्षणिक समुहाचे अध्यक्ष धनराज विसपुते व इतर मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यभरातील रयतेचा कैवारच्या प्रतिनिधींना प्रेरणा मिळाली, या हेतूने निवडक ११ प्रतिनिधीना विशेष सेवा गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. सर्व पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, पुष्पगुच्छ आणि रयतेचा कैवारी दिवाळी अंक भेट देण्यात आली. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज विसपुते, उपसंचालक मुंबई मनिषा पवार, रायगड जिल्हा परिषद उपशिक्षणअधिकारी सुनिता पांटोलकर, भाजप शिक्षक आघाडीचे अनिल बोरनारे, मठाधिपती बाबा महाराज शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष राजेश सुर्वे , रयतेचा कैवारीचे
संपादक शाहू भारती सर, शिक्षक सेना कोकण विभाग अध्यक्ष सुधीर शेठ, आदी मान्यवर उपस्थित होते. दिपक शनवारे यांना शिक्षक भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन होत आहे.