
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
भूम:- येथील माजी मुख्याध्यापक आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शाहीर चोखोबा काशिनाथ कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय ७४ वर्ष होते.शाहीर कांबळे हे पुण्यनगरी भूम तालुका प्रतिनिधी व मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद कांबळे व शिक्षक बप्पा कांबळे यांचे वडील होते. चोखोबा कांबळे प्रसिद्ध शाहीर होते.आपल्या शाहिरीतून जनजागृतीच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनात सामजिक क्रांतीची मशाल पेठवत ठेवली.शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचाराचे पाईक होते.त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले, दोन मुली, सुना,नातवंडे असा परिवार आहे. अंत्यविधीला मुख्याधिकारी तानाजी चव्हाण ,माजी नगराध्यक्ष संजय गाढवे,वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांच्यासह,शैक्षणिक, सामाजिक, राजकीय ,संस्कृतिक,
जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधव या क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.