
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
वाहतूक विस्कळीत:- पुलावरून पाणी वाहत असल्याने पुणे-भोगलगाव कासारी वारेवडगाव मार्गे येणारी बस तीन तसे अडकून राहिली.
भूम:- तालुक्यातील वारेवडगाव – कासारी -भोगलगाव या गावांना जोडणारा पूल जीर्ण झाला असून त्या पुलाची उंची अतिशय कमी असल्यामुळे पावसाळ्यात येण्या-जण्या साठी जीव मुठीत धरून कसरत करावी लागत आहे. तहसीलदार कार्यालय या मार्फत बांधकाम विभाग यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, २०/०९/२२ मंगळ रोजी सायं.५ वाजण्याच्या सुमारास झालेल्या पावसामुळ शेतकर्यांना शेतातुन गावाकडे येत असताना पुलावरुन पाणी गेल्यामुळ पुलाचे पाणी ओसरण्यास तीन तास लागल्यामुळ अडकुन राहवे लागले आहे. पुणे-भोगलगाव ,कासारी,वारेवडगाव मार्गे भुम येणारी बस देखील अडकून पडली होती शेतकरी, नागरिक, विध्यार्थी हैराण झाले होते. सदरील होत असलेली अडचण लक्षात घेता छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने नवीन पुल बांधण्याची मागणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले. या निवेदनात स्वाक्षरी छावा क्रांतीवीर सेनेचे तालुका अध्यक्ष गणेश नलवडे,विठ्ठल बाराते, किरण गोफणे, विवेक नलवडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.