
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी-नवनाथ यादव
शिबिरात १०२ रुग्णांची तपासणी, तालुक्यातील रुग्णांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद
परांडा:- मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत शिबीर आयोजित करण्यात आले.शिबिरामध्ये एकूण १०२ रुग्णांची नोंद करून बिपी ,शुगर,कर्करोग, नेत्रतपासणी, मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली.सदरील शिबिरामध्ये नेत्र चिकिस्तक अधिकारी डॉ.शेटे गजानान,वैद्यकिय अधिकारी ,डॉ.अमिता वराडे, नेत्र सहाय्यक भराटे सतिश, समुदेशक गुंजाळ तानाजी,अधिपरिचारिका जगदाळे ज्योती आदी अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.