
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:-पोलीस हक्क संरक्षक संघटनेच्या कंधार तालुकाध्यक्ष पदी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते शहाजी पा. शिंदे यांची निवड करण्यात आली. नियुक्ती करून पत्र देताना पोलीस हक्क संरक्षक संघटनेचे परभणी जिल्हाध्यक्ष तथा नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख व्याख्याते विनोदअण्णा भोसले जिल्हा उपाध्यक्ष कैलास पांगरकर,गोविंद क्षीरसागर, किशोर घुले आदींची उपस्थिती होती.
निवडीबद्दल राजमुद्रा सामाजिक संघटनेचे नेते संस्थापक अध्यक्ष सचिन पाटील इंगोले साहेब प्रदेशाध्यक्ष शिवप्रसाद पाटील तेलंग मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पाटील पवार शिवसेनेचे जिल्हाउपप्रमुख बाळासाहेब कराळे शिवसेना तालुकाप्रमुख प्ररमेश्वर जाधव शहर प्रमुख धनराज पाटील लुगांरे छावा तालुका अध्यक्ष संभाजी पाटील लाडेकर मराठा महासंग्राम जिल्हाध्यक्ष प्रदीप पाटील हुंबाड राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सचिव माधव पाटील घोरबांड रमाकांत पाटील जोगदंड राजमुद्रा चे राज्य सचिव सचिन चव्हाण जिल्हा सचिव श्रीकांत पाटील बस्वदे राज्य कार्यकारिणी सदस्य साईनाथ पाटील गोडबोले हदगाव चे सामाजिक कार्यकर्ते सुभाष घुंगराव देगलुरचे सामाजिक कार्यकर्ते बालाजी पाटील साक्षर भारत संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज पाटील पवार सल्लागार प्रा प्रभाकर व्यवहारे साक्षर भारत संघटनेचे जिल्हाध्यक्ष पी आर चिखलभोसीकर राजमुद्रा महीला जिल्हाध्यक्षा पार्वती ताई केंद्रे यांच्या सह सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.