
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कौठा:-प्राथमिक आरोग्य केंद्र. बारूळ अंतर्गत आरोग्यवर्धनी केंद्र कौठा येथे दि.१४ ते३०सप्टेंबर दरम्यान संशयित कुष्ठ रोग व क्षय रोग शोध मोहीम द्वारे संशयित क्षय रुग्ण यांची एक्सरे तपासणी करण्यासाठी कौठा येथुन संशियत रोग्ण्याणा निशुल्क बारूळ येथे पाठविण्यात येत आहे. कौठा प्राथमिक आरोग्य उपकेन्द्रा अंतर्गत कौठा शिरुर चौकीमहाकाया येथील दोन आठवड्या पेक्षा जास्त दिवस खोकला ताप येत असलेल्या रोग्ण्यास शासकीय वाहानाने प्राथमिक आरोग्य केन्द्र बारुळ येथे मोफत तपासणी व एक्सरे काढण्यात येत आहे यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी घरोघर जाऊन नागरिकांना माहिती देत आजार असेल तर तात्कांळ उपचार करुण घेण्याचा सल्ला देत आहेत यावेळी समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.शेळके आणि आरोग्य सहाय्यक शिखरे साहेब, एमपीडब्लु व्ही. पी. गोडबोले गयाबाई तेलंगे परिश्रम घेत आहेत.