
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील पोलीस चौकीवरील काम करणाऱ्या पोलीस कर्मचार्यांना चौकीच्या ठिकाणी राहण्यासाठी व्यवस्था नाही. त्यामुळे तो भले कर्मचारी शहरी भागात म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी राहून येणजाणे करून काम करतात. त्यामुळे सदरील कर्मचारी व जनतेची गैरसोय होते. जनतेचा आणि पोलीस कर्मचारी यांचा एकमेकांशी संबंध येत नाही. सामान्य जनतेला भेटणे व काम करणे अवघड झाले आहे. त्यासाठी शासनातर्फे निवासाची व्यवस्था करण्यात यावी, सदरील अधिकार्यांना शासकीय निवास असणे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांनी शासकीय निवासाची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्री. जाधव व्यंकटी, श्री.माधव विभुते, श्री. पांडुरंग कंधारे यांनी केली आहे.