
दैनिक चालू वार्ता कौठा सर्कल प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
सिरसी खुर्द :- सिरसी खुर्द येथे लंम्पी रोगाचे मोफत लसीकरण करण्यात आले असून उर्वरित जनावरांना लसीकरण करण्यात येणार आहे. पेठवडज येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी -१ च्या वतीने ग्रामीण भागातील सर्व गावात जनावरांना मोफत लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी उपस्थित पशुवैद्यकीय अधिकारी पेठवडज श्रेणी -१ डॉ. रवि ना. तोप्पावार (पशुधन विकास अधिकारी), परिचर प्रल्हाद विठ्ठलराव केंद्रे, सेवादाता पांडुरंग शंकर परतवाड, वरवंटकर आनंदा शंकर, सचिन मारोती सरोदे , सिरसी खुर्द येथील पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या पशुना लसीकरण करून घेतले.