
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
पेठवडज :- कंधार तालुक्यातील पेठवडज विविध बाबतीत नेहमी चर्चेत राहणार गाव म्हणून प्रसिद्ध आहे. आज पेठवडज सर्कलच नव्हे तर संपूर्ण नांदेड जिल्हात नावलौकिकतेचा दबदबा आहे. ऐन बैलपोळा काळात अनेक विविध सामाजिक, शैक्षणिक, राजकिय लोकांच्या अंतकरणातली माणसं सोडून गेल्याच्या दु:खामुळे अनेक समाजातील भावकीने बैलपोळा साजरा केलाच नाही… पण, सुतक संपताच आपल्या खास शैलीत जगाच्या पोशींद्यानं अख्ख मार्केट गाजवून अचानक संपूर्ण कंधार तालुक्यालाच अचंबित करणारं दि.२५ सप्टेंबर रविवारी बैलपोळ्याचे दृश्य पाहण्याजोगे होते.खरच अनेकांच्या ओठांतुन एकच हवा… काय ते बैल, काय ती पब्लिक, काय तो नियोजनबद्ध करेक्ट कार्यक्रम… अगदी कसं ओके मध्ये हाय! म्हणत होते. मोठ्या उत्साहात बैलपोळा साजरा करण्यात आला, गावातील नागरीक बैलपोळा पाहण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.