
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार:- राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने तेलुर येथे आर्थिक व डिजिटल मेळाव्याचे आयोजन जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांच्या उपस्थितीत पार पडले .
कंधार तालुक्यातील तेलुर येथे जिल्हा मध्यवर्ती बँक आर्थिक व डिजिटल साक्षरता अभियाना योजने अंतर्गत मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असता कौठा शाखे अंतर्गत येते असलेल्या गावातुन १६ लक्ष रुपय डिपोजिट बँकेत जमा केल्याने सर्व ठेवीदाराचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला जिल्हा मध्यवर्ती बँक हि सर्वसामान्य शेतकरी शेत मजूराची असुन सर्वाच्या सहकार्यातुन बँकेला गतवैभव प्राप्त करुण देवू अशे प्रकाश पवार यांनी सागितले यावेळीबाबुराव देशमुख शिरुरचे सरपंच सुधाकर जाधव राजु भडारे नागोराव देशमुख माधव वाकोरे सेवासहकारी सोसायटीचे चेअरमन बाबुराव कदम शंकरराव आगलावे मारोतराव कऊटकर बाळू पानपट्टे प्रकाश पा जाधव पंडित येरावार किशन महाजन वसंत मटके बालाजी काकडे शिवराज जाधव आदि उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाखा अधिकारी धर्माजी सुब्बनवाड शिन्दे, संभाजी पवळे रामकिशन डूमणे बालाजी पवळे आदिने परिश्रम घेतले यावेळी परिसराती चेअरमन सरपंच उपसरपंच ग्राम पंचायत सदस्य सेवासहकारी सोसायटीचे सदस्य शेतकरी मोठ्या सःख्येने उपस्थित होते.