
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
माता सुरक्षित तर घरं सुरक्षित या
कार्यक्रमाचे उद्घाटन लोहा
नगरपालिकेच्या नगरसेविका सौ गोदावरी गजानन सूर्यवंशी यांच्या हस्ते झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोहा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अब्दुल बारी सर होते यावेळी सुप्रियाताई सूर्यवंशी श्री सचिन सूर्यवंशी उपस्थित होते तसेच लोहा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सौ शितल पानझडे डॉक्टर रुबी सय्यद मॅडम डॉक्टर पूर्वा सरकार मॅडम डॉक्टर सारिका शेख मॅडम डॉक्टर प्रशांत जाधव डॉक्टर गणेश चव्हाण डॉक्टर दिनेश राठोड व सर्व कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर दीपक मोटे यांनी केले प्रस्ताविक डॉक्टर लोहारे यांनी केले व आभार प्रदर्शन श्री मोरे यांनी केले यावेळी यावेळी उद्घाटनपर कार्यक्रमात बोलताना सो गोदावरीताई सूर्यवंशी या म्हणाल्या माता सुरक्षित असतील तरच घर सुरक्षित असते व महिला घरची सर्व जिम्मेदारी सांभाळून स्वतःला सांभाळून पूर्ण घर सांभाळण्याचे काम करत असते महिलांच्या जबाबदाऱ्या काय असतात महिलांना अडचणी काय असतात यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले यावेळी डॉ पाटील यांनी शिबिरामधून सर्व महिलांनी आपली आरोग्य तपासणी करून व उपचार करून या शिबिराचा फायदा घेण्याचे सांगितले आहे तसेच या शिबिराचा फायदा सर्व लोहा शहरातील व परिसरातील महिलांनी घ्यावा असे आव्हान केले व त्यांनीं स्वतःची व आपल्या परीवाराच्या आरोग्याची काळजी घ्यावी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला लोहा शहरातील महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती