
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर- संतोष मंनधरणे.
देगलर: बिलोली तालुक्यातील बडूर गावातून प्रथम पोलीस होण्याचा बहुमान मिळवव अनेक तरुणांना पोलीस भरतीसाठी प्रेरित करून मार्गदर्शन केले. आमचे लाडके मेव्हणे कै. संतोष मठपती यांचे दि. १/१०/२०२० रोजी दुःखद निधन झाले आणि मन सुन्न झाले. एखादी बातमी कधीच मनी ना ध्यानी असावी असा हा प्रसंग होता. पहाटे उठताच बातमी कळाली आणि निशब्द झालो ४ जून १९९० मठपती घराण्यातील कोहिनूर हिरा उदयास आला. तो हिरा आपल्या कर्तृत्ववाने चमकत राहीला. देशाला कोविडने ग्रासले असताना आपली कर्तव्य विसरून घरी राहणे त्यांना पसंद पडले नाही आणि सुट्टीवर असताना त्यांनी ती सुट्टी रद्द करून आपण आपली सेवा देशाच्या प्रति द्यावी अशी निष्ठा ठेवत सेवा बजवण्यासाठी गेले ते पुन्हा काही परत आलेच नाहीत. दैनंदिन जीवनात सेवा बजावत असताना त्यांना लागण झाली आणि स्वतःचा जीव देखील गमवावा लागला.
भूम परंडा येथे महाविद्यालयात डी.एड. केले मग लगेच शिक्षक भरती झाली होती त्यांनी ती अतिशय जोमाने अभ्यास करून दिली पण नशीब त्यांच्या बाजूने नव्हते तेव्हा थोड्या गुणांनी शिक्षक झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी ठरवलं आता खाकी वर्दी अंगावर चढल्याशिवाय थांबायचं नाही मग नांदेड येथे अभ्यास करून आणि मैदानी सरावा सुरू केला अतिशय जीव तोडून मेहनत करून 2011 वर्षात नांदेड मध्ये भरती झाले त्यांनी त्यांच्या सेवेच्या काळात कुठल्याही एक रुपयाचा भ्रष्ट केला नाही व आहारी गेले नाही उल्लेखिल बाब मनाला खूप भावणारी आहे आम्हा सर्वांना म्हणाले होते की मी सुट्टीत येईन दवाखान्यात असता वेळेस ऍडमिट असताना मी माझा भाऊ म्हणलो होतो येऊ का भेटायला कोणी यायचं नाही मी ठीक आहे मीच येऊन सर्वांना भेटतो अशी म्हणाले होते 15 ते 20 दिवसांपूर्वी आमची भेट झाली होती वाटलं नव्हतं की ही शेवटची भेट असेल सोडून गेले ते कधीच परत न येण्याची मामा,मामी,मनीषा,पिऊ व मोठा परिवार परमेश्वर त्यांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो व द्वितीय पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!