
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
कलयुगात सुद्धा , सत्य युग ञेतायुग,द्वापारयुग,या युगातील अध्यात्म व ज्ञान हे कलयुगातील लोकांच्या कल्याणासाठी कामी पडल पाहिजे.महणुन या पावन भुमित श्री दत्तात्रेय यांनी अवतार धारण करून , नवनाथ यांना अनुग्रह दिला.नव नाथ यांच्या माध्यमातून नाथ संप्रदायाची पताका अगदी देश विदेशात तर फडाकवली पण ञिलोकात सुद्धा फडाकवली , आणि ज्ञान, धर्म, अध्यात्म, सात्विक वृत्ती, अहिंसा दया,क्षमा, शांती,हि जीवन मुल्य लोक कल्याणकारी आहेत .याचा बीज मंत्र दिला. हा मंत्र हि परंपरा हि शिकवण पुढे तेराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आपले गुरू निवृत्ती नाथ महाराज यांच्या कडुन अनुग्रह प्राप्त करून त्याचा पाया रचला व तुकाराम महाराज यांनी कळस निर्माण केला व तदनंतर अनेक संत महंत यांनी अवतार धारण करून हि परंपरा पुढे चालवली.महाराष्ट्राच्या पावनभुमित अहिंसेचा यज्ञ संत महंतांनी पेटावल त्याच महायज्ञ राष्ट्र पिता महात्मा गांधी यांनी रूपांतर करून देशाच्या कानाकोपऱ्यात घरोघरी पोहचवला व फल स्वरूप इंग्रजांना या देशातुन काढता पाय घ्यावा लागला.अहिंसा हा अध्यात्माचा पाया आहे. आध्यत्मिक वृत्ती चा व्यक्ति हा सदैव अहिंसेचा पुजारी असतो . अहिंसा हि सात्विक वृत्ती आहे . ज्यामध्ये त्याग समर्पण, लोक कल्याण, निस्वार्थ,परहित भाव सामावलेला आहे. म्हणून अहिंसा हा संत परंपरेचा पाया आहे हि महाराष्ट्रातील संत पंरपरने जगाला दिलेली सर्वतम उपलधी आहे. हे विश्वची माझे घर हि उदात्त संकल्पना विश्व गुरू संत श्रेष्ठ ज्ञानेशवर महाराज यांनी सर्व प्रथम जगासमोर मांडली तद नंतर ,संत निवृत्तीनाथ, संत मुक्ताबाई,संत विश्व गुरू माहत्मा बसवेश्वर,संत तुकाराम महाराज,संत एकनाथ महाराज,संत नामदेव,साई बाबा, महाराज,संत सावता माळी, संत सद्गुरु स्वामी समर्थ,संत गजानन महाराज, गाडगेबाबा,संत तुकडोजी महाराज, संत बंकट स्वामी महाराज ,संत गोरा कुंभार,संत अवजीनाथ महाराज,संत भगवान बाबा,संत वामन भाऊ महाराज, असे अनेक थोर संत अवतारी महापुरुष भारतासारख्या खंडप्राय देशात व महाराष्ट्रातील पावनभुमित होऊन गेले. ज्यांनी अहिंसा च्या मार्गाने लोकांना जीवन जगण्यासाठी उपदेश केला. हिंसा मग कोणतीही असो त्यापासून दूर राहून ज्ञान भक्ती आणि अध्यात्म हे जीवनाचे सार्थक आहे.हे लोकांच्या मनावर बिंबवले आणि आणि अनेक लोक सद मार्गावर आणले. राष्ट्र संत भगवान बाबा यांनी तर पशू हत्या अहिंसा मार्गाने बंद करण्यासाठी चिंचाळा तालुका वडवणी जिल्हा बीड येथे देशात इंग्रज व मराठवाडयात हैदराबाद स्थित निजामशाही राजवट असताना प्रत्यक्षात घटनास्थळी उपस्थित राहुन गायीचे प्राण वाचविले म्हणजे प्रत्यक्ष बळी देण्यासाठी सजवलेली गाय बाबांच्या अथक प्रयत्नानंतर सोडुन दिली गेली आणि अहिंसा मार्गाने सगळ्यात मोठी पशुहत्या स्व इच्छेने गोहत्या बंदी प्रथा त्याठिकाणी बंद झाली .व प्रथमच सर्वसाधारण साधे पणे जत्रा पार पडली . आणि गोहत्या करून होणारा यात्रा उत्सव हि परंपरा संपुष्टात आली व ऐतिहासिक गोहत्याबंदीस सुरुवात झाली.महणजे एकंदरीत देशात इंग्रज राजवटीच्या विरोधात आंदोलन चालू असताना महाराष्ट्र सह देशात महाराष्ट्रातील अनेक संत महंत यांनी अहिंसेचा महायज्ञ पेटवला होता .तोच यज्ञ पुढे राष्ट्र पिता महात्मा गांधी यांनी घरोघरी पोहचला . महाराष्ट्राच्या पावनभुमितील संतपरंपरेतील अहिंसा जगातिक पातळीवर विराट रूपाने महात्मा गांधी यांनी जगाला अहिंसेच समर्थ आणि शक्ति परिचय घडवून आणला. राष्ट्र पिता महात्मा गांधी यांच्या माध्यमातून इंग्रजांच्या विरोधात लढाईच मुख्य शस्त्र असलेली अहिंसा हि मुळात महाराष्ट्रातील संत परंपरा व अध्यात्माचा पाया हि अभिमानाची व आनंदाची गौरवाची बाब आहे. आणि याच अहिंसेचा महाराष्ट्रात जो यज्ञ संतांनी प्ररंभ केला त्याच देशभरात महात्मा गांधी यांनी देशपातळीवर महायज्ञ केला आणि फल स्वरूप देशाला स्वातंत्र्य मिळालं एकंदरीत संतांनी दिलेली अहिसेंची शिकवण हि देशाच्या हितासाठी कल्याणासाठी उपयोगी ठरली . आणि जगातिक पातळीवर अहिंसा हे भारताच्या ओळखीचे प्रतिक ठरलं .
गणेश खाडे
संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य तथा वंजारी समाज ईतिहास अभ्यासक व लेखक बालसंस्कार शिबिर अध्यात्मिक मार्गदर्शक 9011634301