
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- अंजनगाव सुर्जी परिसरातील नेहरू चौकात पोलीस चौकी बनविण्यासाठी कारण नसतांना १२ ते १५ वर्ष जुनी हिरव्या झाडांची कत्तल करण्यात आली.
चौकशी केली असता न.प.प्रशासनाने ठाणेदारांच्या विनंतीवरून बेकायदेशीर तीन झाडे तोडण्याची परवानगी दिली.ह्यामध्ये निंब,कडु बदाम,मेहंदी अश्या तीन झाडे समाविष्ट असून बेकायदेशीर रित्या परवानगी दिली.
वास्तविक पाहता पोलीस चौकी बनविण्यासाठी झाडे तोडण्याची कोणतीही गरज नव्हती पोलीस चौकी ज्याठिकाणी बांधण्यात येत आहे त्यामागील १० फुट जागा रिकामी सोडण्यात येत आहे.
अंजनगाव सुर्जी मधील नेहरू चौकाच्या सौंदर्यीकरणाच्या दृष्टीकोनातून नेहरू पुतळ्याचे सौंदर्यीकरण होणे गरजेचे होते.तसेच पोलीस चौकीकरिता पर्यायी जागा म्हणून डॉ.देव्हारे यांच्या दवाखान्यासमोरील उर्दु शाळेची जागा प्रशस्त,मोकळी, व सर्व सुविधांनी परिपूर्ण असल्यावर सुद्धा ती जागा न घेता नेहरू पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाला अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे.एकीकडे शासन झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देत आहे मात्र तेच प्रशासन झाडे तोडण्याचा अट्टाहास करीत आहेत.