
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी कालखंडात एखाद्या गाव खेड्यालाही लाज वाटावी असा रस्ता परभणी महापालिका क्षेत्रात आजही अस्तित्वात आहे. मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्याची ही बकाल अवस्था बघून कोणालाही कमालीची चीड येऊ शकेल परंतु महापालिकेला मात्र त्याचे यत्किंचितही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
परभणी शहरात नुकताच पाऊस पडला आहे. रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते हा संशोधनाचा भाग असला तरी दिवसाकाठी या रस्यावर किती वाहनांचे अपघात होतात आणि त्यात कितीजण जखमी होतात याची आकडेवारी मात्र प्रमाणापेक्षाही जास्त झालीआहे, हे खेदाने सांगावेसे वाटते.
गुलशन बाग ते देशमुख हॉटेल दरम्यानचा हा कारेगाव रस्ता आहे. अत्यंत दयनीय अशी दूरावस्था एखाद्या गाव खेड्यातही दिसून येणार नसली तरी महापालिका क्षेत्र असलेल्या परभणीत मात्र अजूनही अस्तित्वात आहे. जीव मुठीत धरुन पायी असो वा वाहनांवर दिवसाकाठी हजारो नागरिक रहदारी करतांना आढळून येत असते. शहराच्या मध्यवस्तीत व जुन्या परिसरातील हा रस्ता किती जणांचे आयुष्य उद्ध्वस्त केल्यानंतर महापालिका सुधारणा करणार आहे ? याचे उत्तरही त्याच प्रशासनाला माहित असावे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने लक्ष घालून परभणीच्या या अशा समस्या सोडविण्यासाठी थकीत असो वा अन्य कोणताही निधी तात्काळ मंजूर करुन पाठवावा अशी नम्र विनंती चालू वार्ता या मराठी दैनिकाचे परभणी जिल्हा उपसंपादक दत्तात्रय वामनराव कराळे यांनी केली आहे.