
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : विद्यार्थ्यांशी सतत संवाद साधला तर त्यांच्यात असलेली भीती नाहिशी होत असते. समोरची व्यक्ती कोण आहे, कुठून आलीय, आपल्यावर ते रागावणार तर नाहीत ना, अशा नानाविध प्रश्नांमुळे गोंधळून एखाद्या दडपणाखाली वावरतात. ती भीती, दडपण घालवण्यासाठी लहान असो वा मोठे, त्यांच्याशी संवाद साधला जाणे गरजेचे असते. किंबहुना त्याच अनुषंगाने विद्यार्थी एकमेकांच्या संगतीने व पंगतीने बसून जेवली तर मात्र निश्चितच त्यांच्या आहारात वाढ होणे स्वाभाविक आहे. असा दृढ विश्वास परभणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे यांनी व्यक्त केला आहे. श्री.टाकसाळे यांची ती संकल्पना पाल्य व पाल्यांच्या पथ्यावर पडणारीच असावी, असं समजायला मुळीच हरकत नाही.
परभणी तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे जिल्हा परिषद सीईओ शिवानंद टाकसाळे यांनी भेट देऊन वरीलप्रमाणे विवेचन केले. मुलांच्या आहारात वाढ करायची असेल तर एकमेकांच्या संगतीने व पंगतीने भोजन दिले गेले तर निश्चितच त्यांच्या भोजनात वृध्दी होऊ शकते, शिवाय संवाद साधला तर भीतीही नाहीशी होऊ शकते अशी केवळ संकल्पनाच नाही तर दृढ विश्वास असल्याचे मानायला हरकत नाही.
श्री. टाकसाळे यांनी आपले सर्व सहकारी, अधिकारी, कर्मचारी आणि अंगणवाडी ताई यांच्या सहकार्याने संबंध जिल्हाभरातील १७०८ एवढ्या अंगणवाड्याना भेटी देऊन तेथे पंगत आयोजित केल्या तर एकूण ३२४८ विद्यार्थ्यांशी संवाद तर साधला आहेच त्याशिवाय एकसंगतीने व पंगतीने बसवून भोजनाचा आस्वाद उपलब्ध करुन दिला असल्याचे समजते. ही संकल्पना व त्यांचा हेतू निश्चितच कौतुकास्पद असाच म्हणावा लागेल.