
दैनिक चालू वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदगाव:- नांदगाव येथे पाणीपुरवठ्या साठी 70 लक्ष व सी.सी. रस्त्यासाठी 30 लक्ष. एकूण एक कोटींच्या कामाचा शुभारंभ भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा सौ.प्रणिताताई देवरे चिखलीकर व भाजप जिल्हा सरचिटणीस प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आला.तसेच श्री संत शिरोमनी बाळगीर महाराज मूर्तीची प्राण प्रतिष्ठा व श्री संत श्री गुरुवर्य जयगीर महाराज यांच्या 15 वी पुण्यतिथी निमित्त दर्शन घेतले.यावेळी माजी जि.प.सदस्य गणेशराव पा.सावळे माजी जि. प. सदस्य सुभाष गायकवाड, पं. स. सदस्य गणेश पा. उबाळे,प्रभाकर मामा मोरे, हौसाजी कांबळे,सुमेध गजभारे,शांताबाई पांचाळ,पुरभाजी पा.भरकडे,पो.पा.दत्ताराम नांदगावकर,दिलीप पा. भरकडे,पुरभा पा.तातेराव पा.,श्रीराम पा.,केरबा पा. कापशीकर,शिवराज पा.जोमेगावकर,तुकाराम पा. हातनीकर,माधव पा. मारतळेकर,कामळज चे सरपंच दिपक कांबळे,वाळकी चे सरपंच बळी पा. बेटकर, कौडगाव चे सरपंच कामाजी पा. भरकडे,पत्रकार गणेशराव ढेपे,पत्रकार देशमुख, पत्रकार जोमेगावकर यांच्यासह गावकरी, भाविक भक्त मोठया संख्येने उपस्थितीत होते.