
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
शेतकरी कामगार पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष योगेश नंदनवनकर तथा युवक जिल्हाध्यक्ष मारुती ऐजगे हे स्थानिक व जिल्हा पातळीवर शेतकरी कामगार पक्षाच्या ध्येय धोरणा विरोधात व पक्षविरोधी काम करत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई शिंदे यांना निदर्शनास आल्यामुळे काल रविवारी शेतकरी कामगार पक्षाचे नांदेड जिल्हा अध्यक्ष योगेश नंदनवनकर व युवक जिल्हाध्यक्ष मारुती ऐजगे यांची शेतकरी कामगार पक्षामधून तडका फडकी हकालपट्टी करण्यात येत असल्याचे शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शिंदे यांनी सांगितले, यापुढे योगेश नंदनवनकर व मारुती ऐजगे यांचा कसल्याच प्रकारचा शेतकरी कामगार पक्षाशी संबंध नसल्याचेही सौ. आशाताई शिंदे यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.