
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी पुणे जिल्हा -गुणाजी मोरे
—————————————-
पुणे :पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी निवड झाल्याबद्दल राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचा भारतीय जनता पक्ष पुणे शहरच्या वतीने अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
मा. चंद्रकांतदादांच्या सक्षम नेतृत्वात पुणे जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती प्राप्त होऊन जिल्ह्याची भरभराट होईल, हा विश्वास आहे.
टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित या सत्कार समारंभास यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरीताई मिसाळ,माजी राज्यमंत्री संजय भेगडे, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार भिमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, सुनिल कांबळे, बापुसाहेब पठारे, योगेश टिळेकर, संघटन मंत्री मकरंद देशपांडे, एस के जैन, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, वर्षा तापकीर, धीरज घाटे, गणेश बिडकर, हेमंत रासने, सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, राजेश येनपुरे, दिपक नागपुरे, दिपक पोटे, दत्ताभाऊ खाडे, संदिप लोणकर, सुशिल मेंगडे, बापू मानकर, संदिप खर्डेकर, प्रमोद कोंढरे, जितेन्द्र पोळेकर, कुणाल टिळेकर, पुनित जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.