
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मशाल हे चिन्ह दिल्यानंतर इंदापुर शहरात शिवसैनिक हातात मशाल घेऊन मंगळवारी (दि.११) रस्त्यावर उतरले. इंदापूर शहरातील अंबीका नगर चौकात फटाक्यांची आतषबाजी करत तेथील मशालीची पुजा करत त्यांनी जल्लोष व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी “शिवसेनेची निशाणी मशाल, आमची निशाणी मशाल” अशा घोषणा देत निशाणीला घराघरांत पोहोचविण्याचे उद्दिष्ट असल्याचे तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांनी पत्रकाराशी संवाद साधताना सांगितले.
चिन्ह गोठविल्यानंतर काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सोमवारी (दि.१०) निवडणूक आयोगाने याबाबत निर्णय घेऊन ठाकरे गटाच्या राजकीय पक्षाला तूर्त शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे तर शिंदे गटाच्या पक्षाला बाळासाहेबांची शिवसेना असे नाव दिले. ठाकरे गटाने त्रिशूळ, उगवता सूर्य आणि मशाल ही तीन चिन्हांची नावे दिली होती. त्यापैकी निवडणूक आयोगाने मशाल चिन्ह मंजूर करून ते दिले आहे.
मशाल हे चिन्ह मिळाल्यानंतर तालुक्यातील ठाकरे गटाचे शिवसैनिक जल्लोष करण्यासाठी रस्त्यावर उतरले यावेळी शिवसैनिकांनी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता.तालुकाप्रमुख नितीनजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या जल्लोषात शहर प्रमुख महादेव सोमवंशी, शहर समन्वयक संजय खंडाळे, उपशहरप्रमुख अशोक देवकर, वसंत आरडे, अवधूत पाटील, दादा देवकर, संतोष क्षीरसागर, उपजिल्हा संघटीका पुष्पाताई घोरपडे,बंडू शेवाळे, दुर्वास शेवाळे,देवा मगर,प्रदीप पवार,काजल राजपूत,माधूरी शिंदे तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.