
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी-संभाजी गोसावी
सातारा तालुक्यांतील बोरखळ गावचे तरुण सरपंच अमोल नथुराम नलावडे (वय ३५) यांनी गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारांस समोर आली या घटनेमुळे सातारा तालुक्यांसह बोरखळ गावात एकच खळबळ उडाली. अमोल नलावडे यांचा आठच महिन्यांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता त्यांच्या आत्महत्येने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली. याबाबत सातारा तालुका पोलीसांनी दिलेल्या माहितीवरून अमोल नलावडे हे बोरखळ गावचे सरपंच होते. बोरखळ गावापासूनच जवळच जरंडेश्वर रोडवर त्यांची पोल्ट्री फार्म आहे. मंगळवारी ११ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारांस वडील नथुराम नलावडे हे पोल्ट्री फार्म मध्ये गेले असता. त्यांना अमोल नलावडे यांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले त्यांनी तातडीने गावकऱ्यांना माहिती दिली सरपंचानी आत्महत्या केल्यांची माहिती वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर नागरिकांनी सातारा तालुका पोलिसांना माहिती देवुन पोल्ट्री फार्मकडे धाव घेतली. अमोल नलावडे हे अत्यंत हुशार आणि कर्तबगार सरपंच म्हणून ते चांगलेच परिचयाचे होते. त्यांच्या आत्महत्येत बाबत परिसरांतून उलटसुलट चर्चा असली तरी आर्थिक विवंचनेतून त्यांनी हे टोकांचे पाऊल उचलले असावे अशी ही चर्चा गावामध्ये सुरू आहे त्यांच्या पश्चांत पत्नी आई-वडील भाऊ असा त्यांचा परिवार होता.