
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा-
केन स्टार किड्स इंग्लिश स्कूल, देवला पुनर्वसन, सेलू येथे दिवाळी निमित्त घरी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू तयार करून आणण्यास सांगितले होते, यात दिवाळी निमित्त आकाश कंदील पालकांच्या मदतीने विद्यार्थ्याना बनवून आणण्यास सांगितले होते, यात सर्वोत्तम आकाश कंदील ची न निवड करण्यात येणार होती, त्या पद्धतीने सर्व विद्यार्थीनी या उपक्रमात मोठ्या हिरहिरीने सहभाग नोंदवला. शाळेतील 50 पेक्षा जास्त विद्यार्थिनी आकाशकंदील तयार करून आणली होती ,यात अनुक्रमे शरयू झोल, काव्या माने, अनुष्का इंगोले, आथरव कचरे, सोहम गायकवाड, युवराज कांबळे, अभिजित मुळे, सोहम खरात यांच्या आकाश कंदील ची निवड करण्यात आली,यावेळी सर्वांना शाळेचे संचालक प्रिंसीपल श्रीराम रेंगे व संचालक कृष्णा गीते यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी उपस्थित संचालक कृष्णा गीते तसेच सर्व शाळेतील शिक्षक कर्मचारी भारती इंगोले, अनुसया वाघमारे, जया माने, प्रतीक्षा थिटे, आशा काळे, मुंजाभाऊ शिंदे, मनीष खेडेकर, अमोल वाहुले आदीनी विद्यार्थ्यांनचे कौतुक केले.