
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भूम:- तालुक्यातील वंजारवाडी येथे बायफ संस्था व पशसंवर्धन विभाग उस्मानाबाद यांच्या वतीने पशू मध्ये होत असलेला लंपी आजार या विषयी शेतकरी प्रशिक्षण देण्यात आले.
बायफ. बी.आय.एस.एल.डी व एच डी एफ सी बँक यांच्या संयुक्त विद्यमाने व पशसंवर्धन विभाग उस्मानाबाद यांच्या मार्गदर्शनाखाली वंजारवाडी ता.भूम दि. १५ ऑक्टोबर रोजी पशु मधील लंपी या आजारा विषयी शेतकरी प्रशिक्षण देण्यात आले.
संपूर्ण देशामध्ये थैमान घातलेल्या पशु मधील लंपी आजारामुळे जनवरांचे होणारे नुकसान व त्यामुळे पशुपालक व शेतकरी यांचे होणारे आर्थिक नुकसान मोठे होत असून त्या अनुषंगाने मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.
प्रशिक्षणा दरम्यान बायफ संस्थेचे डॉ. कृष्णा जाधव यांनी लंपी या आजाराची लक्षणे,उपाय व काळजी या बद्दल सविस्तर माहिती सांगितली. तसेच पशुपालकांनी आजाराला घाबरून न जाता योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले.बायफ संस्थेचे सुधाकर बागल प्रकल्प अधिकारी यांनी ‘ दुग्ध व्यवस्थापन मार्फत स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना प्रकल्प ‘ अंतर्गत पशुपालकांना कोणते लाभ मिळणार आहेत याबद्दल मार्गदर्शन केले. तसेच ९० % कालवडी होणारे इंजेक्शन वापरून पशुपालकांनी जास्तीत जास्त जातिवंत व चांगल्या प्रतीच्या कालवडी तयार करण्या बद्दल मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमास गावचे प्रभाकर डोंबाळे उपाध्यक्ष काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग उस्मानाबाद ,अध्यक्ष तंटामुक्त समिती वंजारवाडी,उपसरपंच नंदकुमार शिंदे,बायफ संस्थेचे डॉ.कृष्णा जाधव वरिष्ठ प्रकल्प अधिकारी,सुधाकर बागल जिल्हा प्रकल्प अधिकारी, नरेश कुलकर क्षेत्रीय प्रकल्प अधिकारी, योगेश दिवटे बायफ केंद्र प्रमुख ,आश्रुबा डोंबाळे,वैभव रुपनवर, बाबू पंडित ,अमोल डोंबाळे ,विष्णू रुपनवर ,दिलीप मोटे,जयसिंग कुंभार ,कल्याण जगदाळे, राहुल मोटे, किशोर जगदाळे ,रमाकांत सोनवणे,तानाजी चंदनशिवे, ऋषी डोंबाळे,गणेश डोंबाळे,कुमार चंदनशिवे, उमेश डोंबाळे,परमेश्वर डोंबाळे, निवांत शिंदे गावातील पशुपालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.