
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- ‘मिशन २८’ यशस्वी करणाऱ्या आणि आकांशा प्रकल्पाद्वारे वंचित तरुणींनाही स्वप्न पाहण्याचा अधिकार देणाऱ्या अमरावतीच्या मा.जिल्हाधिकारी पवनीत कौर ठरल्या ‘लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2022’ आय.ए.एस.(प्रोमिसिंग) पुरस्काराच्या मानकरी.
——————————————-
अमरावती जिल्ह्यातील माझ्या मेहनती आणि समर्पित टीमच्या प्रयत्नाशिवाय हे शक्य झाले नसते.आज हा पुरस्कार मी अमरावती जिल्हा प्रमुख म्हणून स्वीकारला,व्यक्ती म्हणून नाही.”मिशन-२८”मेळघाट प्रदेशात बालमृत्यू कमी करण्यात आणि संस्थात्मक प्रसुती वाढविण्यात सकारात्मक परिणाम दाखवत आहे.आम्ही २६ सप्टेंबर २०२२ रोजी विदर्भातील वंचित मुलींसाठी “आकांशा”प्रकल्प सुरू केला आहे आणि मला आशा आहे की हा प्रकल्प डिजिटल कौशल्याद्वारे मुलींना सक्षम करेल आणि त्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देईल जेणेकरून त्या स्वावलंबी होऊ शकतील.
श्रीमती पवनीत कौर,जिल्हाधिकारी,अमरावती
——————————————-