
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- कंधार तालुक्यातील नंदनवन व दगडसांगवी येथील नवदाम्पत्याचा झाली शाल अंगठी.दगडसांगवीचे प्रतिष्ठित नागरिक श्री.विलास तुकाराम पाटील फाजगे यांचे व्दितीय चिरंजीव श्रीराम व नंदनवनचे प्रतिष्ठित नागरिक श्री.हनमंत केशवराव पाटील हुंबाड यांची व्दितीय कन्या चि.सौ.कां.संध्या यांच्या शाल अंगठीचा कार्यक्रम साईदत्त मंगल कार्यालय सिडको येथे दुपारी ठीक १ वाजताच्या शुभ मुहूर्तावर संपन्न झाला.यावेळी नेते, कार्यक्रते, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, पाहुणे मंडळी, मित्रमंडळी, नातेवाईक,दगडसांगवी व नंदनवनचे प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.