
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी -श्री,रमेश राठोड
*******************************
आर्णि तालुक्यातील सावळी सदोबा प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त आहेत, या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे रुग्णावर उपचार करण्यास अडथळा निर्माण होत आहे,सध्या साथीच्या आजाराने डोके वर काढले असून,सर्दी, खोकला,ताप अशा रुग्णांची प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गर्दी वाढली आहे, अनेक पदे रिक्त असल्यामुळे परिसरातील नागरिकांना खाजगी रुग्णालय जावे लागत आहे,यात नागरिकांना आर्थिक भुदंड सहन करावा लागत आहे, या प्राथमिक केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षात घेता, या प्राथमिक आरोग्य केंद्रात अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशी नसल्याने येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे प्रयोगशाळा तंत्रज्ञ,औषध निर्माण अधिकारी, आरोग्यसेवक चार पद,आरोग्य सेविका तीन पद, परिचर तिनं पदे,अंशकालीन स्त्री परिचर तीन पदे असे बहुतांश पदे रिक्त असल्यामुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यावरील कामाचा ताण वाढलेला आहे, त्याचा त्रास रुग्णांना होत आहे, या आरोग्य केंद्रात 32 गावाचा समावेश आहे,आरोग्य विभागामार्फत वेळोवेळी बैठका व सभा घेण्यात येतात,सर्वेक्षण,रिपोर्टीग, कार्यालयीन कामकाज,कुटुंब नियोजन,यासारखे विविध कार्यक्रम राबविले जातात,मात्र आरोग्य केंद्रात रिक्त पदे असल्याने याचा परिणाम रुग्णसेवेवर होत आहे