
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी- माधव गोटमवाड
कंधार तालुक्या मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्य अतीशय जोमाने वाढवण्यासाठी या पुर्वी चळवळीमध्ये अतीशय जोमाने काम करणा-या कार्यकर्त्याला आज जिल्ह्यमध्ये न्याय मिळत आहे त्याच प्रमाणे कंधार तालुक्यातील हिप्परगा गावचे रहिवासी असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते श्री कमलाकर जायभाये यांची आज नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हरिहरराव भोसीकर साहेब यांनी कमलाकर जायभाये यांच्या कामाची दखल घेऊन त्यांची नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी नियुक्ती केली त्यांच्या या नियुक्ति चे पत्र आज नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री हरिहरराव भोसीकर साहेब , उमरी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब गोरठेकर व जिल्हा सरचिटणीस श्री प्रा. जांभरुणकर सर यांच्या उपस्थीतीमध्ये देण्यात आले त्या मुळे कंधार /लोहा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सच्च्या कार्यकर्त्या मध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे तसेच नांदेड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष श्री हरिहरराव भोसीकर साहेब यांचे सर्व कार्यकर्त्यांनी आभार व्यक्त केले व पक्ष वाढी साठी आम्ही भोसीकर साहेबां सोबत एकदिलाने काम करुन पक्षाची ध्येय धोरण सर्व सामान्य नागरीकांपर्यंत पोंचवु आसेही मत व्यक्त केले. या प्रसंगी त्यांच्या सोबत श्री बाबाराव थोटे ,मुकुंदराव चिवडे व इतर मान्यवर उपस्थीत होते.