
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
वाई उपविभागीय पोलीस अधिकारी आणि खाकी वर्दी म्हणजे फक्त गुन्हेगारी रोखण्यासाठीच नसून तर ती समाजात आवर पण निर्माण करते याचे उदाहरण. म्हणजेच श्रीमती डॉ.शितल जानवे मॅडम! आपल्या शासकीय कारकीर्दीची सुरुवात गव्हर्मेंट मेडिकल ऑफिसर कोल्हापूर येथून पंचायत समिती पन्हाळा येथून केली. २००८ ते २०१३ या कालावधीत त्यांनी काम केले.त्यावेळी २०११ मध्ये त्यांनी पोलीस उपअधीक्षक पदासाठी एमपीएससी परीक्षा दिली याच परीक्षेत त्या पास झाल्या. त्यानंतर नाशिक येथे ट्रेनिंग झाल्यानंतर २०१३ पासून त्या पोलीस उपअधीक्षक या पदावर कार्यरत झाल्या. त्यांनी सुरुवातीला यवतमाळ येथे प्रमोशनरी पोलीस उपअधीक्षक म्हणून सेवेला सुरुवात केली. त्यानंतर नाशिक, रत्नागिरी चिपळूण, खेड येथे त्यांची नियुक्ती झाली आणि खेड या दोन डिव्हिजन मधील नऊ पोलीस ठाण्यांचा कार्यभार त्यांच्याकडे होता. त्यांनी राज्य गुप्तवार्ता विभागांत अप्पर उप आयुक्त म्हणूनही काम पाहिले होते. नुकतीच तुरुची (जिल्हा सांगली ) येथील प्रशिक्षण केंद्रामध्ये त्या कार्यरत होत्या. तिथून त्यांची वाई पोलीस उपविभागांमध्ये सन २०२० मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून नियुक्ती झाली. कायदा ( सुव्यवस्था अबावित राखण्यासाठी यशस्वी ) ऐतिहासिक सातारा जिल्ह्यात नियुक्ती झाल्यापासून त्यांनी वाई ग्रामीण विभागांमध्ये त्यांच्या सिंघम कारवाईमुळे अवैध धंद्यावर चांगलेच धाबे दणाणले होते.अवैध-धंदे समुळ नष्ट करण्यांचा तसेच अवैध धंद्यामुळे पैसा उपलब्ध होऊन समाजांत गुंडगिरी फौफावते कायदा-सुव्यवस्था प्रश्न निर्माण होता. यासाठी अवैध-धंदे समुळ नष्ट केल्यास समाजात शांतता राखली जाईल या हेतूने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वाई ग्रामीण विभागांमध्ये कायदा-सुव्यवस्था अबधित राखत आपला उपविभागीय विभागीय चार्ज ठेवण्यांत त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे.अशा या खाकीतल्या रणरागिणीला सातारा जिल्हा प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी गुरुवारी दुपारी वाई उपविभागीय पोलीस कार्यालयांमध्ये सदिंच्छा भेट घेत.त्यांच्या कामगिरीबद्दल विशेष कौतुक करीत दीपावलीच्या त्यांना मंगलमय शुभेच्छा पुरीगोसावी यांनी यावेळी व्यक्त केल्या. पुरीगोसावी आणि मॅडम यांचा सांगली जिल्ह्यांपासून चांगलाच परिचय आहे. मॅडम तुम्ही वाई उपविभागीय या पदाचा पदभार घेतल्यापासून ही दुसरी माझी सदिंच्छा भेट असल्यांचे उपविभागीय पोलीस अधिकारी आणि कर्तव्यदक्ष डॉ.शितल जानवे-खराडे मॅडम यांना आवर्जून सांगितले. त्यांच्या कामगिरीबद्दल वेळोवेळी त्यांना माननीय पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्संल व अप्पर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे यांच्या हस्ते वेळोवेळी प्रशासकीय सन्मान परिपत्रक देवुन गौरविण्यांत येत असते. एक महिला पोलीस अधिकारी आपल्या कुटुंबाचा संसाराचा गाडा सांभाळत. पोलीस प्रशासनांमध्ये सुद्धा त्यांची कामगिरी चांगलीच उत्कृंष्ट ठरत आहे. श्रीमती डॉ. शितल जानवे-खराडे मॅडम यांची पोलीस प्रशासनांमध्ये कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांचा चांगलाच परिचय आहे.