
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
इंदापूर तालुक्यामध्ये प्रथमच राज्यस्तरीय वेटलिफ्टिंग आणि बेंचप्रेस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या स्पर्धेचे आयोजन शिव शंभो पॅलेस- पुणे सोलापूर रोड वरकुट पाटी जवळ बळपुडी ता.इंदापूर येथे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री मा. हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या हस्ते झाले यावेळी प्रमुख उपस्थिती श्री.महारुद्र पाटील माजी तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी ,निलेश देवकर रयत क्रांती शेतकरी संघटना पुणे जिल्हाध्यक्ष, संतोष काळे पळसदेव माजी सरपंच ,गोरख शिंदे माजी नगरसेवक, चित्तरंजन पाटील उद्योजक, मेघा शाम पाटील मार्केट कमिटी संचालक, शिवसेना शहर प्रमुख मेजर महादेव सोमवंशी, तालुका समन्वयक अरुण पवार ,कर्मयोगी कारखाना संचालक प्रवीण देवकर ,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, सुरेश बापू शिंदे, श्री संजय सरदेसाई सरचिटणीस महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन, ॲड. रवींद्र यादव, सचिव महाराष्ट्र राज्य पावर लिफ्टिंग असोसिएशन अनंत चाळके, पंच शिवछत्रपती पुरस्कार विजेते सूर्यकांत गर्दे आदी मान्यवर व क्रीडा शौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये २२ जिल्ह्यातून ४०५ पुरुष खेळाडू व १७५ महिला खेळाडूंनी सहभाग घेतला होता. तर स्पर्धाचे आयोजन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन शिंदे ,माजी संचालक कर्मयोगी सहकारी साखर कारखाना श्री देविदास पाटील ,शिव शंभो पॅलेस चे सर्वेसर्वा व देवपूजा पतसंस्थेचे संस्थापक श्री सुधीर पाटील, व न्यूट्रिरीच सप्लीमेंट, फिटनेस फोर्ट चे संस्थापक मयूर शिंदे यांनी केले आहे.