दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
परतूर येथील क्रांती भवन
येथे दीपावली स्नेह मीलनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला याप्रसंगी गुणवंतांचा सत्कार वेगवेगळ्या क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या समाज बांधवांचा सत्कार करण्यात आला यामध्ये शिवश्री राहुलभैय्या लोणीकर यांची नुकतीच भारतीय जनता पार्टीच्या युवक प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली त्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला नीट परीक्षेत 500 पेक्षा जास्त मार्क्स मिळवलेल्या भक्ती भानुदास कदम , अनुराग महादेव दवणे ,यश संजय कासतोडे ,ओंकार बद्रीनाथ बाबर ,अदिती बद्रीनाथ बाबर
डॉ. आशिष बाबुराव मातणे
MDS (Oral & Maxillofacial Surgeon)
विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ,
अभय काळुंके यांना आपल्या रोपवटीकेच्या माध्यमातून वेगवेगळे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले म्हणून एक प्रेरणादायी उद्योजक म्हणून सत्कार करण्यात आला ,
प्रा छबुराव भांडवळकर यांची हुरहूर मॉडर्न कॉलेज घनसांवगी च्या अभ्यासक्रमाला ठेवण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला ,
याप्रसंगी भक्ती गीत , भावगीत , देशभक्तीपर गीत व प्रेरणादायी गीतांच्या माध्यमातून कार्यक्रम पार पडला , प्रमुख उपस्थितीत शिवशाहीर अरविंद घोगरे सिने अभिनेते संभाजी तांगडे गायक प्रा . रामेश्वर नरवडे शारदाताई राजबिंडे , अरुण बंड निकिता बंड प्रज्ञा बंड दिपाली कुलकर्णी ,महादेव थोरात यांनी वेगवेगळ्या गीतांनी मनोरंजन केले परतूर शहरातील सर्व व्यापारी मित्रांनी या कार्यक्रमासाठी विशेष प्रयत्न केले , कार्यक्रमाला परतूर मंठा परिसरातील समाज बांधवांची उपस्थिती होती !
