
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा शिवसेना जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे यांच्या वतीने गुरुवार (ता.27) रोजी आयोजित दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाला मान्यवरांनी उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. नगरपंचायत समोरील प्रांगणात मंठा – परतूर- नेर – सेवली मतदारसंघासह जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, डॉक्टर्स, वकील, व्यापारी, पत्रकार,अधिकारी कर्मचारी व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. ही दिवाळी सर्वांच्या जीवनात सुख – समृद्धी आणि भरभराट घेऊन येवो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवो अशा शुभेच्छा जिल्हाप्रमुख ए.जे. बोराडे यांनी दिल्या. या दीपावली स्नेहमिलन कार्यक्रमाला माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया,गोपाळराव बोराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, अंकुशराव अवचार, उपजिल्हाप्रमुख माधवराव कदम,बाबासाहेब तेलगड, अँड पंकज बोराडे,माजी सभापती संतोष वरकड, शिवसेना तालुकाप्रमुख अजय अवचार,परतुर तालुका प्रमुख अशोक आघाव, जिल्हा परिषद सदस्य शिवाजी शेजुळ,पंचायत समिती सदस्य कल्याण खरात,पंचायत समिती सदस्य किसनराव मोरे, मधुकर काकडे,बाबाराव राठोड, माजी पंचायत समिती सदस्य प्रदीप बोराडे, माजी सभापती संजय छल्लाणी, भारतराव बोराडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बबनराव गणगे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निळकंठ वायाळ, परतुर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बाबा गाडगे,पोलीस उपनिरीक्षक आसमान शिंदे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रताप चाटसे, प्राचार्य भारत खंदारे, अंकुशराव मोरे,माजी उपनगराध्यक्ष बालासाहेब बोराडे,गटनेते अचित बोराडे, सिराज खान पठाण,जे के कुरेशी, सभापती बाजखा पठाण, माजी सरपंच जलील भाई, इसामुद्दीन पटेल, ज्ञानदेव फुफाटे, डॉ.डी.जे.काकडे,विष्णुपंत बोराडे, सुदर्शन सोळंके, बद्रीनाथ खवणे,सुहास कांबळे,बाळासाहेब अंभीरे, कय्युमभाई कुरेशी,सुभाष राठोड,शबाब कुरेशी, वसंतराव जाधव,अँड सचिन झोल,जगदीश सरकटे, मनोज देशमुख,गणेश शहाणे,दिलीप चव्हाण, वसंतराव वाघमारे,महेश नळगे,जे.पी.बंसल,हरिभाऊ चव्हाण, प्रा.माणिकराव थिटे,प्रा सदाशिव कमळकर, महादेव वाघमारे, तुळशीराम कोहिरे, उपतालुकाप्रमुख संजय नागरे,अँड ज्ञानेश्वर जाधव, कबीर तांबोळी, वसंतराव काकडे,सरपंच संदीप मोरे, विजय दवणे, पंढरीनाथ दवणे, योगेश नाईक, हनुमान दवणे.नवनाथ नाईक, कैलास सरकटे ,अण्णासाहेब सरकटे यांच्यासह मतदारसंघातील विविध पक्षाचे प्रमुख पदाधिकारी राजकीय नेते डॉक्टर्स असोसिएशन व्यापारी महासंघ मेडिकल असोसिएशन प्राचार्य प्राध्यापक शिक्षक वृंद पत्रकार संघटना शेतकरी बांधव रिक्षा असोसिएशन ड्रायव्हर युनियन विविध गावचे सरपंच चेअरमन हितचिंतक मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.कार्यक्रम यशस्वितेसाठी पप्पू दायमा यांच्यासह शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यानी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.